29 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरविशेषआत्महत्येपूर्वी सलग २९ तास अनन्वित छळ!

आत्महत्येपूर्वी सलग २९ तास अनन्वित छळ!

सिद्धार्थनच्या आत्महत्येप्रकरणी नवी बाब उघड

Google News Follow

Related

केरळमध्ये रॅगिंगला कंटाळून एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर आता नव्या धक्कादायक बाबी उघड होत आहेत. ५ एप्रिल रोजी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने जेएस सिद्धार्थन आत्महत्येप्रकरणी एफआयआर नोंदवला असून सिद्धार्थनने आत्महत्या करण्याच्या आदल्या दिवशी त्याचा सतत २९ तास वरिष्ठ आणि वर्गमित्रांकडून मानसिक आणि शारीरिक छळ केला गेल्याचे उघड झाले आहे.

मुख्य आरोपी म्हणून अखिल के तर, काशीनंदन आर, अमीन अकबराली यू, अरुण के, सिंजो जॉन्सन, एन आसिफ खान, अमन इहसान, अजय जे, अल्ताफ ए, सौद रिसाल ईके, आदित्यन व्ही, मोहम्मद धनीश, रेहान बिनॉय, आकाश एसडी, अभिषेक एस, श्रीहरी आरडी, डॉन्स दाई, बिलगेट जोशवा थन्निककोडे, नसीफ व्ही, आणि अभि ए अशी अन्य आरोपींची नावे आहेत.

महाविद्यालयाचे रॅगिंग विरोधी पथक, महाविद्यालयाचे डीन, शवविच्छेदन करणारे वैद्यकीय अधिकारी आणि इतर साक्षीदारांच्या जबाबांचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. ‘सिद्धार्थनचा काही ज्येष्ठ विद्यार्थी आणि वर्गमित्रांनी शारीरिक आणि मानसिक छळ केला. त्यांनी १६ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी नऊ ते १७ फेब्रुवारी २०२४पर्यंत सतत हाताने आणि बेल्टने सिद्धार्थनला मारहाण केली आणि त्याचे क्रूरपणे रॅगिंग केले,’ असे यात म्हटले आहे.

रॅगिंगमुळे त्याला मोठा मानसिक ताण आला. आपण या संस्थेत अभ्यास सुरू ठेवू शकत नाही आणि हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकत नाही किंवा अभ्यासक्रम सोडून घरीही जाऊ शकत नाही, या प्रश्नांनी त्याला ग्रासले. तो खूप मानसिक तणावाखाली असल्याने त्याला वाटले की, त्याच्यापुढे आत्महत्येशिवाय पर्याय नाही. त्यामुळे त्याने १८ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा ते पाऊणच्या दरम्यान पुरुषांच्या वसतिगृहाच्या बाथरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली.

पोलिसांनी सुरुवातीला अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली. मात्र, पीडितेवर वरिष्ठ आणि वर्गमित्रांकडून अत्याचार झाल्याचे तपासात समोर आले आहे. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) चे नेते अरुण के, अमल इहसान, आसिफ खान आणि अभिषेक एस व्यतिरिक्त, सीबीआयने इतर अनेक आरोपींच्या नावांचा उल्लेख केला आहे.
१८ फेब्रुवारी रोजी, २० वर्षीय जेएस सिद्धार्थन वसतिगृहात मृतावस्थेत आढळला.

हे ही वाचा..

रायगडमध्ये शिवशाही बसचा अपघात, तिघांचा मृत्यू!

काँग्रेसचा गरिबी हटावचा नारा फक्त निवडणुकी पुरताच!

ओवैसींविरोधात लढणाऱ्या माधवी लता यांचे पंतप्रधानांकडून कौतुक

पंजाबमध्ये ५५ वर्षीय महिलेची नग्न धिंड; तिघांना अटक, दोघांचा शोध सुरू

सिद्धार्थनच्या मृत्यूमुळे राज्यात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केरळ पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू एमआर ससेंद्रनाथ यांना निलंबित केले. याशिवाय रॅगिंगविरोधी समितीच्या शिफारशीवरून विद्यापीठातील ३१ विद्यार्थ्यांनाही या प्रकरणाशी संबंध असल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. बहुतेक सदस्य माकपशी संलग्न असलेल्या स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सदस्य आहेत. आतापर्यंत एकूण ११ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यापैकी चार एसएफआयचे नेते आहेत.

मृत्यूपूर्वी त्याला जबर मारहाण झाल्याचाही समावेश आहे. शिवाय, त्याचे पोट रिकामे होते आणि त्याच्या शरीरावर जखमा होत्या. त्याच्या डोक्याला, जबड्याला आणि पाठीला दुखापत झाली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली. डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी नेत्यांचा समावेश असलेल्या १२ विद्यार्थ्यांनाही महाविद्यालयातून निलंबित करण्यात आले होते, कारण त्याच्या अँटी-रॅगिंग समितीने पीडितेला त्याच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी सहकारी विद्यार्थ्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याचे आढळले होते.

सिद्धार्थनच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी त्यांच्या मुलावर सतत अत्याचार करत होते. निलंबित एसएफआय नेते आणि सदस्यांमध्ये कॉलेज युनियनचे अध्यक्ष, एक युनियन सदस्य आणि एसएफआय युनिट सेक्रेटरी यांचा समावेश आहे.९ मार्च रोजी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले. विरोधी पक्ष आणि विद्यार्थ्याच्या वडिलांनी विद्यार्थ्याच्या मृत्यूसाठी एसएफआयला जबाबदार धरले होते.
३१ मार्च रोजी, जेएस सिद्धार्थनचे वडील जयप्रकाश यांनी त्यांच्या मुलाच्या मृत्यूच्या संदर्भात केरळ सरकारवर गंभीर आरोप केले आणि सांगितले की, जर कारवाई झाली नाही, तर ते त्यांच्या पत्नीसह क्लिफ हाऊस (केरळचे मुख्यमंत्री निवासस्थान) बाहेर आंदोलन करतील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा