केरळमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. गेल्या २४ तासात वाढलेल्या रुग्णसंख्येमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद ही केरळमध्ये झाली आहे. काल एकाच दिवसात केरळमध्ये २५ हजार १० नवीन रुग्णांची भर पडली तर १७७ लोकांचा मृत्यू झाला आहे.
देशात लसीकरणाच्या कार्यक्रमाने ७३ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात देशात ३३ हजार ३७६ नव्या रुग्णांची भर पडली आहे तर ३०८ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या २४ तासात एकूण ३२ हजार १९८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्या आधीचा विचार करता गुरुवारी देशात ३४ हजार ९७६ नव्या रुग्णांची भर पडली होती तर २६० जणांचा मृत्यू झाला होता.
राज्यात शुक्रवारी ४,१५४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार ५२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६४ लाख ९१ हजार १७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्के आहे. गुरुवारी ४४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून राज्याचा एकूण मृत्यूदर २.१२ टक्के इतका झाला आहे.
हे ही वाचा:
ममतांचा पुन्हा पराभव करायला भाजपाकडून ‘या’ महिलेला उमेदवारी
तालिबानच्या कब्जानंतर राशिद खानचा राजीनामा
सापडले १५०० वर्षापूर्वीचे गुप्त काळातील मंदिराचे अवशेष
भारतातील लसीकरणाच्या कार्यक्रमाने चांगलाच वेग घेतला असून ७३ कोटी डोसचा टप्पा ओलांडला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी संध्याकाळी याबाबतची आकडेवारी जारी केली. त्यामध्ये सांगिलं आहे की, देशातील ५५.५८ कोटी नागरिकांना लसीचा पहिला डोस आणि १७.३८ कोटी नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. देशातील १८ टक्के नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.