‘केरळ मॉडेल’ तोंडावर आपटले

‘केरळ मॉडेल’ तोंडावर आपटले

Health workers carry the body of a man, who died from the coronavirus disease (COVID-19), from an ambulance for burial at a graveyard in New Delhi, India, April 16, 2021. REUTERS/Danish Siddiqui - RC2WWM92VDCY

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत १२ हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात ३० हजार ९४१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एकट्या केरळमध्येच १९,६२२ म्हणजे जवळपास दोन तृतीयांश नवे रुग्ण सापडले असून राज्यात १३२ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर कालच्या दिवसात देशात ३५० कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. या आकडेवारीमुळे भारताचे कोविड मॉडेल यशस्वी ठरताना दिसत असून केरळ मॉडेल मात्र सपशेल अपयशी ठरताना दिसत आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासूनच आतापर्यंत एकूण तीन कोटी २७ लाख ६८ हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ४ लाख ३८ हजार५६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आतापर्यंत ३ कोटी १९ लाख ५९ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांहून अधिक आहे. एकूण ३ लाख ७० हजार रुग्णांवर अद्यापही उपचार सुरु आहेत.

हे ही वाचा:

मुंबईला पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले, पुन्हा जागोजागी तुंबई

…आणि अमेरीकेचं शेवटचं विमान काबुलमधून उडालं

भविष्यात पेट्रोल-डिझेल हद्दपार करा!

बनावट तिकीट तपासनीसांचीच झाली तपासणी

राज्यात काल (सोमवार) ३,७४१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार ६९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ६८ हजार ११२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ टक्के आहे.

Exit mobile version