26 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषशेतकऱ्यावर हल्ला करणाऱ्या नरभक्षक वाघाला पकडा अन्यथा ठार करा!

शेतकऱ्यावर हल्ला करणाऱ्या नरभक्षक वाघाला पकडा अन्यथा ठार करा!

केरळ सरकारचे वनविभागाला आदेश

Google News Follow

Related

वाघाच्या हल्ल्यात कालपेटाजवळ एका ३६वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या एका दिवसानंतर केरळ सरकारने नरभक्षक वाघाला शांत करून बंदी करा अन्यथा त्याला ठार करा, असे आदेश केरळ सरकारने वनविभागाला दिले आहेत.

प्रजीश कुट्टप्पन मारोट्टीपारंबिल हे शनिवारी सकाळी आपल्या गुरांना चारण्यासाठी जंगलात गेले असता वाघाने त्यांच्यावर हल्ला केला.वाघाच्या हल्ल्यात प्रजीश कुट्टप्पन या ३६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याचा अर्धा खाल्लेला मृतदेह शनिवारी वायनाडमधील वाकेरी येथील जंगल परिसरात सापडला.

अनेक तास उलटूनही तो परत न आल्याने त्याचा भाऊ त्याचा शोध घेत असताना त्याला प्रजीशचा मृतदेह जंगलापासून जवळच असलेल्या मळ्यात आढळून आला. वाघाच्या हल्ल्यामुळे रहिवाशांनी निषेध केला ज्यांनी मानवभक्षी प्राण्याला मारण्यासाठी अधिकाऱ्यांनी पावले उचलण्याची मागणी केली.या घटनेनंतर केरळ वनविभागाने रविवारी एक आदेश जारी करून या नरभक्षक प्राण्याची हत्या करण्यास सांगितले.

हेही वाचा :

आजचा निकाल हा केवळ कायदेशीर निकाल नसून हा एक आशेचा किरण आहे!

कलम-३७० हटवण्याचा निर्णय योग्यच!

अंतराळ शक्ती बनण्यासाठी भारतीय हवाई दलाने कंबर कसली!

ट्रक चालक आता अनुभवणार ठंडा ठंडा कूल कूल

तथापि, आदेशात असे नमूद केले आहे की, प्रथमतः हा प्राणी खरंच नरभक्षक आहे का? याची तपासणी करून वन अधिकाऱ्यांनी पुढील पावले उचलावी, असे देखील आदेशात सांगितले आहे.आदेशात असे लिहिले आहे की, “जर प्राण्याला पकडले जाऊ शकत नाही किंवा शांत केले जाऊ शकत नाही आणि तो मनुष्यभक्षक झाला असेल तर त्याला ठार मारण्यात यावे, कारण ते या प्रदेशातील मानवी जीवनासाठी धोकादायक आहेत.या नरभक्षक वाघाचा शोध घेण्यासाठी वनविभागाने विविध ठिकाणी ११ कॅमेरे बसवले आहेत.

दरम्यान, एका वन अधिकाऱ्यांने सांगितले की, आमच्या नोंदणीनुसार या परिसरात एकूण तीन वाघ आहेत.ज्या वाघाने या शेतकऱ्यावर हल्ला केला, त्याची ओळख पटविण्याचे काम चालू आहे.आमच्याकडे एक अस्पष्ट फोटो आहे, त्यानुसार आम्ही पुढची पावले उचलू असे अधिकाऱ्यांनी सांगितले.तसेच या वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारीमध्ये, वायनाड जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात ५२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता.

ऑगस्ट २०१७ मध्ये केरळ सरकारने विधानसभेला माहिती दिली की, राज्यातील पेरियार आणि पारंबीकुलम व्याघ्र प्रकल्पात केलेल्या व्याघ्रगणनेनुसार, २०१६ मध्ये या अभयारण्यांमध्ये ५८ मोठ्या वाघांची उपस्थिती आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा