केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान!

भाजपा आमदार नितेश राणेंचे वादग्रस्त वक्तव्य

केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान!

‘केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान’ असे वादग्रस्त वक्तव्य भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले आहे. रविवारी (२९ डिसेंबर) पुण्यामध्ये शिवप्रताप दिनानिमित्त अफजल खान वधाचा आनंदोत्सव हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला संबोधित करताना नितेश राणेंनी हे वक्तव्य केले आहे.

नितेश राणे म्हणाले, केरळ हा मिनी पाकिस्तान आहे. म्हणूनच राहुल गांधींची बहिण तेथून निवडून येते, सगळे अतिरेकीच त्यांना मतदान करतात. अतिरेक्यांना धरुनच हे खासदार झाले आहेत, असे नितेश राणे म्हणाले.

‘जो कायदा अन्य धर्मियांना लागतो, तोच कायदा हिंदू धर्माला लागतो. कायद्याच्या चौकटीत सगळं काम हेच आम्हाला अपेक्षित आहे. जे सगळे कायदे अन्य लोकांना लावता, तोच कायद्या आम्हाला लावा. अफजल खान वधाचा पोस्टर तुम्ही लावू नका, यातून भावना दुखवतील असा स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले होते,’ असे नितेश राणे म्हणाले.

ज्या देशात ८५ टक्के हिंदू राहतात, आमच्या नसा नसात छत्रपती शिवाजी महाराज आहेत, मग त्या महाराष्ट्रात त्या देशात आम्ही अफजलखानाच्या वधाचे पोस्टर लावायचे नाहीत ? मग पाकिस्तानमध्ये लावणार का ? असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, चार-दोन टकल्यांच्या भावना दुखवणार असतील, तर मग त्यांनी पाकिस्तान, बांगलादेश येथे जाऊन दाढी कुरवाळावी.

हे ही वाचा : 

संतापजनक! बांगलादेशात नमाजावेळी त्रास झाल्याने श्वानाला फासावर लटकवले!

बेकायदेशीर बांगलादेशींचा पालिका कर्मचाऱ्यांवर हल्ला

मेलबर्न कसोटीमध्ये यशस्वीचा एकाकी लढा अपयशी; ऑस्ट्रेलियाने मिळवला मोठा विजय

दक्षिण कोरियाचे विमान कोसळण्याआधी काय घडले ?

 

Exit mobile version