सिरीयन-मलबार चर्चने ख्रिश्चन स्त्रियांच्या बाटवाबाटीचे प्रकार होत असून हा लव जिहादचाच एक भाग असल्याचे मागे एका पत्रकात म्हटले होते. त्यानंतर इतके दिवस हा संघ परिवाराचा अजेंडा आहे असे म्हणणाऱ्या द प्रिंट सारख्या तथाकथित लेफ्ट लिबरल (डाव्या उदारमतवादी) वृत्त वाहिनीने देखील याची दखल घेतली आहे. त्यावरून ‘स्वराज्य’ या वृत्तवाहिनीचे संपादक आर. जगन्नाथन यांनी प्रिंटचे संस्थापक शेखर गुप्ता यांना टोला लगावला आहे.
आजवर हिंदू समाजातील काही संस्थांकडून लग्नाचे आमिष दाखवून, फसवून लबाडीने धर्मांतर करून घेणाऱ्या मुस्लिमांच्या चालीबद्दल वारंवार बोलले गेले होते. मात्र त्याकडे मुख्य प्रवाहातील माध्यमांनी संघ परिवाराचा अजेंडा या नावाने दुर्लक्ष करून, उलट सामाजिक शांतता भंग करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असल्याची ओरड चालवली होती. मात्र काही दिवसांपूर्वी, हीच गोष्ट केरळमधल्या ख्रिश्चन स्त्रियांबाबत केली जात असल्याची धक्कादायक माहिती, तिथल्या सिरीयन- मलबार चर्चच्या अधिकृत पत्रकातून उघड झाली.
हे ही वाचा:
अमित शाहांनी वाहिली हुतात्मा जवानांना श्रद्धांजली
अनिल देशमुखांची केस आता सीबीआयकडे
सामान्य जनतेसाठी लॉकडाऊन, मंत्री मात्र विनामास्क प्रचारात
चर्चने काढलेल्या या पत्रकात ख्रिश्चन स्त्रियांना धोका असल्याचे म्हटले होते. त्यांना लव जिहादचे शिकार केले जात असल्याचे देखील म्हटले गेले होते. इतके दिवस लव जिहादकडे कानाडोळा करणाऱ्या द प्रिंट सारख्या वृत्तवाहिनीने तिथे जाऊन या प्रकाराबद्दल काही लोकांशी चर्चा देखील केली. त्यानंतर द प्रिंटचे संस्थापक शेखर गुप्ता यांनी चक्क ट्वीट करताना ख्रिश्चन स्त्रियांना बाटवण्यासाठी लव जिहादचा कसा वापर केला जात आहे ते पहा अशा आशयाचे ट्विट देखील केले.
या त्यांच्या ट्वीटवर स्वराज्य या वेबपोर्टलच संपादक व्यवस्थापक आर. जगन्नाथन यांनी टोला लगावला आहे. ते म्हणतात की, ख्रिश्चनांनी याविरुद्ध आवाज उठवल्यानंतर यावर किमान विश्वास ठेवण्याची तयारी तरी दाखवली.
You are at least willing to believe it when Christians are the ones protesting… https://t.co/X9KdHcmCOq
— R Jagannathan (@TheJaggi) April 3, 2021