केरळमधील शाळेत मुलं- मुली वापरणार सारखाच गणवेश

केरळमधील शाळेत मुलं- मुली वापरणार सारखाच गणवेश

केरळमध्ये एका शाळेने लिंग समानता दर्शवण्यासाठी पाऊल उचलले असून शाळेत मुलांसारखाच गणवेश मुलींसाठी लागू केला आहे. केरळच्या बालुसेरी सरकारी मुलींच्या उच्च माध्यमिक विद्यालयात हा गणवेश लागू करण्यात आला आहे. काहीजणांनी या निर्णयाचे कौतुक केले तर काही मुस्लिम गटांनी विरोध केला आहे. मुले आणि मुलींसाठी सारखाच गणवेश लागू करणारी केरळमधील ही पहिली सरकारी उच्च माध्यमिक शाळा बनली आहे.

बुधवारी या निर्णयाच्या निषेधार्थ विविध मुस्लिम संघटनांनी शाळेवर मोर्चा काढला. गुरुवारी अनेक ११वीच्या विद्यार्थिनी शर्ट आणि ट्राउझर्समध्ये शाळेत आल्या होत्या. आपण ट्रेंडसह पुढे जावे. शाळेबाहेर मी प्रसंगानुसार कपडे घालते. शाळेत पँट आणि शर्टला विरोध का? असा प्रश्न फातिमा या विद्यार्थिनीने प्रसारमाध्यमांशी बोलताना विचारला आहे. काही मुस्लिम पालकांनाही याचा काही आक्षेप नाही. आमच्या शाळेतील नवीन गणवेश पाहून इतर शाळांमधील माझ्या मित्आर- मैत्नंरिणींनाही आनंद झाला आहे. आम्ही सायकल घेऊन येतो शाळेत त्यामुळे हा गणवेश आमच्यासाठी सोयीचा आहे, असे फातिमा म्हणाली.

हे ही वाचा:

अबब! भटक्या कुत्र्यांना खायला घातले म्हणून एवढा दंड?

राज्य परीक्षा अधिकाऱ्याच्या घरात सापडले घबाड

महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक

बेस्ट मुख्यमंत्र्यांचा घरातून चालवलेला ‘बेस्ट कारभार’

प्राचार्य आर इंदू म्हणाले की, १२वीत शिकणाऱ्या मुलींनीच मागच्या वर्षी मुलांप्रमाणेच गणवेश घालण्याची इच्छा व्यक्त केली होती. या विषयी आम्ही पालकांसोबत चर्चा करून मग हा निर्णय घेतला. फक्त एक- दोन पालकांनीच तेव्हा आक्षेप घेतला होता. मात्र, त्यांच्या मुलीही शर्ट आणि ट्राउझर्समध्ये येत आहेत. या निषेधाची काळजी आमच्या शाळेला नव्हती, कारण लोक कोणत्याही असामान्य गोष्टीला विरोध करत असतात.

Exit mobile version