अंतरिम जामिनाच्या मुदतवाढीसाठी केजरीवालांची धावाधाव

सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका

अंतरिम जामिनाच्या मुदतवाढीसाठी केजरीवालांची धावाधाव

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे कथित मद्य धोरण घोटाळयासंबंधित प्रकरणात जामीनावर बाहेर आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांची अंतरिम जामीन याचिका मंजूर करताना २ जून रोजी आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. यानंतर आता अरविंद केजारीवाल यांनी त्यांच्या अंतरिम जामिनाला सात दिवसांची मुदतवाढ द्यावी अशी मागणी करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या मागणी संदर्भातील याचिका केजरीवालांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. आरोग्याच्या काही तपासण्या करण्यासाठी केजरीवलांनी जामीन वाढवून मागितल्याचे वृत्त आहे.

कथित मद्य धोरणप्रकरणी २१ मार्च रोजी ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन अर्ज मंजूर केला होता. १० मे रोजी त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. यावेळी त्यांच्यासोमार अट ठेवण्यात आली होती की, त्यांचा अंतरिम जामीन संपुष्टात येण्याच्या एका दिवसानंतर म्हणजे २ जून रोजी तुरुंग प्रशासनासमोर हजर रहावे लागणार आहे. परंतु, केजरीवाल यांना पीईटी-सीटी स्कॅन आणि इतर वैद्यकीय चाचण्या कराव्या लागणार आहेत. यासाठी त्यांनी तपासण्यांसाठी सात दिवस मागितले आहेत, अशी माहिती आहे.

हे ही वाचा:

पश्चिम बंगाल-ओडिशाच्या किनाऱ्यावर ‘रेमल चक्रीवादळ’ धडकण्याची शक्यता!

फिरकीपटूंची भेदक गोलंदाजी; गंभीर- नारायणचा मास्टरस्ट्रोक

मालेगावात माजी महापौरांवर गोळीबार

पुणे अपघात: वेदांतच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल करणाऱ्या ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक

मात्र, १० मे रोजी त्यांची अंतरिम जामीन याचिका मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांना २ जून रोजी आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे. अंतरिम जामीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्री कार्यालयात किंवा दिल्ली सचिवालयातही जाऊ शकत नाहीत. तसेच या खटल्याबद्दल भाष्य करू नये किंवा कोणत्याही साक्षीदाराशी संवाद साधू नये, असेही सांगण्यात आले आहे. अंतरिम जामीन मिळाल्यापासून अरविंद केजरीवाल हे लोकसभेसाठी पक्षाचा प्रचार करत आहेत.

Exit mobile version