अरविंद केजरीवाल यांच्याकडून बिभव कुमारचा बचाव; हल्ल्याच्या वेळी ते घरीच होते

स्वाती मालीवाल यांचा आरोप

अरविंद केजरीवाल यांच्याकडून बिभव कुमारचा बचाव; हल्ल्याच्या वेळी ते घरीच होते

आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी गुरुवारी अरविंद केजरीवाल यांच्यावर त्यांचे सहकारी बिभव कुमार यांचा बचाव करत असल्याचा आरोप केला आणि कुमार यांनी त्यांच्यावर हल्ला केला तेव्हा केजरीवाल त्यांच्या निवासस्थानी होते, असा दावाही केला. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्वाती मालीवाल यांनी हे दावे केले. ‘हे सत्य आहे की आजपर्यंत हे सर्व घडत असूनही, मला अरविंदजींचा एकही फोन आलेला नाही किंवा ते मला आजपर्यंत भेटलेले नाहीत. अरविंदजी आरोपींना संरक्षण देत आहेत. माझे चारित्र्यहनन करण्याच्या सूचना पक्षातील प्रत्येकाला देण्यात आल्या आहेत,’ असा आरोप त्यांनी केला.

मालीवाल यांनी १३ मे रोजी घडलेल्या घटनेबाबत सांगितले. ‘मी १३ मे रोजी सकाळी नऊ वाजता अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेले होते. त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मला ड्रॉईंग रूममध्ये बसण्यास सांगितले आणि मला सांगितले की, अरविंदजी घरी आहेत आणि लवकरच मला भेटायला येणार आहेत. पुढच्याच क्षणी, बिभव कुमार ड्रॉईंग रूममध्ये घुसला. मी त्याला विचारले की काहीतरी गडबड झाली आहे का? त्यावेळी, त्याने मला मारण्यास सुरुवात केली. त्याने मला सात ते आठवेळा पूर्ण ताकदीने मारहाण केली. जेव्हा मी त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने माझा हात पकडला. माझे डोके टेबलावर आदळले, त्यानंतर त्याने मला लाथ मारण्यास सुरुवात केली,’ मालिवाल सांगत होत्या. त्यांनी मदतीसाठी हाका मारूनही कोणीही त्यांच्यासाठी पुढे आले नाही.

‘मला मदत करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही हे विचित्र होते,’ असे त्या म्हणाल्या. बिभव कुमार कोणीतरी दिलेल्या सूचनांनुसार काम करत आहे का, असे विचारले असता मालीवाल म्हणाल्या, ‘आता ही सर्व चौकशीची बाब आहे. मी दिल्ली पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करत आहे. पण होय, मी कोणालाही क्लीन चिट देत नाही. कारण मी ड्रॉईंग रूममध्ये होते तेव्हा अरविंद केजरीवाल घरी होते.’

‘माझ्या स्वत:च्या सुरक्षेची, माझ्या करिअरची आणि हे लोक माझ्यासोबत किती प्रमाणात सोबत असतील, याची मला पर्वा नव्हती. मी स्वतःशीच विचार केला की मी प्रत्येक स्त्रीला सत्याची बाजू घ्यायला सांगते, खऱ्या तक्रारी नोंदवते, पण जेव्हा तुमच्याबाबत काही चुकीचे घडते, तेव्हा तुम्ही उभ्या राहून त्याविरुद्ध लढता, आज मी तेच करत आहे,’ असे मालिवाल म्हणाल्या. मालीवाल यांनी पोलिसांना त्यांची पॉलीग्राफ चाचणी करण्यास सांगितले, जेणेकरुन सर्व काही स्पष्ट होईल.

हे ही वाचा:

डोंबिवली एमआयडीसी स्फोट प्रकरणातील फरार कंपनी मालकास अटक!

छत्तीसगडमध्ये ८ नक्षलवाद्यांना टिपले, चकमक सुरू!

अभिनेत्री लैला खान हत्याकांड प्रकरणी सावत्र पित्याला फाशी

भारतीय हवाई कंपनी इंडिगोला पहिल्यांदा झाला फायदाच फायदा!

बुधवारी स्वाती मालीवाल यांनी दावा केला की, तिच्या कथित प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणावरून राजकीय वाद आणखी तीव्र झाल्यामुळे आपच्या वरिष्ठ नेत्यांवर त्यांच्यावर कारवाई करण्याचा दबाव होता. तिने दावा केला की, एका ‘आप’ नेत्याने फोन करून तिला सांगितले की पक्षाच्या काही सदस्यांना ‘घाणेरड्या गोष्टी बोलण्यासाठी’ किंवा ‘वैयक्तिक छायाचित्रे लीक करून तिचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी’ केले गेले होते. केजरीवाल यांच्या माजी स्वीय सहाय्यकावरील हल्ल्याचे आरोप हे भाजपने रचलेले षडयंत्र असल्याचा दावा आप करत आहे. या प्रकरणाची दिल्ली पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

Exit mobile version