उद्योगपती आणि काँग्रेसनेत्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा आहे. हे त्यांनी उघडपणे जाहीरही केले आहे. अमेठीतून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी त्यांनी तशी इच्छाही जाहीर केली होती. मात्र त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. मात्र, वाड्रा यांना कोणताही प्रश्न विचारल्यास ते निर्धास्तपणे उत्तर देतात. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना संधीसाधू, काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांना अनुभवशून्य आणि मणिशंकर अय्यर यांना बडबडे संबोधले. याचा व्हिडीओ व्हायरल झाल आहे.
वाड्रा यांनी एका मुलाखतीत केवळ एका शब्दात उत्तर देताना हे मत व्यक्त केले. त्यांनी केजरीवाल यांना संधीसाधू म्हटल्यावर आप आणि काँग्रेस दिल्लीमध्ये मिळून निवडणूक लढवत आहेत, याची आठवण त्यांना करून देण्यात आली. त्यावर वाड्रा यांनी हा माझा विचार आहे, असे स्पष्ट केले. तसेच, पाकिस्तानजवळ अणुबॉम्ब आहेत, त्यांच्याशी चर्चा करा, असा सल्ला देणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांना रॉबर्ट वाड्रा यांनी बडबडे असे संबोधले.
पित्रोदा यांनी सेवानिवृत्तच राहिले पाहिजे
आपल्या वादग्रस्त मतांनी काँग्रेसला अडचणींत आणणारे सॅम पित्रोदा यांच्यावरही वाड्रा यांनी मत व्यक्त केले. सेवानिवृत्त व्यक्तींना सेवानिवृत्तच राहिले पाहिजे, असे ते म्हणाले. पित्रोदा यांनी नुकतीच भारतीयांच्या त्वचेच्या रंगावरून टिप्पणी केली होती.
हे ही वाचा:
पराभवाचे खापर भाऊ-बहिणींवर नाही, तर तुमच्यावर फुटणार.. खर्गे साहेब तुमची नोकरी जाणार!
ठाकरेंच्या लंडन दौऱ्याचा एजेंडा काय?
‘आप’चा पाय आणखी खोलात; स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी बिभव कुमारचा जामीन नाकारला
डॉ.अजय तावरे म्हणतो, ‘मी शांत बसणार नाही, सर्वांची नावे घेणार’
निवडणूक लढवण्यापासून प्रियांकांना कोण रोखतेय? वाड्रा यांना हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी कोणीही नाही, असे उत्तर दिले. प्रियंकाला स्वतःच निवडणूक लढवायची नाही. त्यांच्या राजकारणातील प्रवेशावर त्यांना प्रश्न विचारले असता, लोकांनी इच्छा व्यक्त केली आणि त्यांच्या कुटुंबाने सांगितले तर नक्की राजकारणात येऊ, असे ते म्हणाले.