अरविंद केजरीवाल यांना सीबीआयचे बोलावणे

केजरीवाल यांना अटक करण्याचे कारस्थान, आम आदमी पक्षाचा आरोप

अरविंद केजरीवाल यांना सीबीआयचे बोलावणे

आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे अडचणीत सापडणार आहेत. मद्य घोटाळ्यासंदर्भात १६ एप्रिलला त्यांची सीबीआयमार्फत चौकशी केली जाणार आहे. त्यात आम आदमी पक्षाने भूमिका मांडली आहे की, केजरीवाल यांना अटक करण्याचे कारस्थान रचले जात आहे.

यासंदर्भात आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी ट्विट करत अत्याचाराचा अंत जरूर होईल, असे विधान केले आहे. संजय सिंह म्हणतात की, सीबीआयने दिलेल्या या नोटिशीमुळे आमचा पक्ष घाबरणार नाही. आमचे नेते केजरीवालही घाबरणार नाहीत. आम्ही झुकणार नाही. केजरीवाल हे सीबीआयच्या नोटिशीप्रमाणे १६ एप्रिलला त्यांच्या कार्यालयात हजर राहतील.

दिल्ली विधानसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मित्राबद्दल जे विधान केजरीवाल यांनी केले त्यामुळेच ही सीबीआयची कारवाई त्यांच्यावर होते आहे. अर्थात, केजरीवाल यांना अटक करण्याचे हे कारस्थान रचले जात आहे.

हे ही वाचा:

मुंबईत अतिरेकी शिरल्याचा फोन त्याने भावाला त्रास देण्यासाठी केला…

बांधकाम व्यावसायिक डीएसके यांच्या विरोधात सीबीआयचे दोन गुन्हे दाखल

आर्थिक गुन्हेगारांना भारतात कसे पाठवता येईल? मोदी-सुनक झाली चर्चा

आधी सावरकरांची माफी मग, मगच महाराष्ट्रात पाऊल ठेवा!

याआधी, आम आदमी पक्षाचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. मद्य धोरणासंदर्भात २६ फेब्रुवारीला सिसोदिया यांना ८ तास चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली. त्यानंतर ९ मार्चला ईडीने त्यांना याच प्रकरणात अटक केली. आता ते सीबीआयच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. मनी लाँड्रिग प्रकरणातही त्यांना कोठडी देण्यात आली आहे.

ऑक्टोबर २०२२ मध्ये मद्य वितरक इंडोस्पीरिट ग्रुपचे संचालक समीर महेंद्रू यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर दिल्ली व पंजाबमध्ये तीन डझन ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती.

 

Exit mobile version