केजरीवाल खाणार, त्यांना साखरेचे देणार! रक्तातील साखर वाढविण्यासाठी आटापीटा

मुधुमेह असूनदेखील साखरेची पातळी वाढवण्याचा प्रताप

केजरीवाल खाणार, त्यांना साखरेचे देणार! रक्तातील साखर वाढविण्यासाठी आटापीटा

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि मद्य धोरणाच्या प्रकरणात अटकेत असणारे अरविंद केजरीवाल हे मधुमेहाचे रुग्ण असून त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढवण्यासाठी आणि वैद्यकीय जामिनासाठी आधार तयार करण्यासाठी रोज आंबा, आलू पुरी आणि मिठाई खात असल्याचे आज इडीने न्यायालयात सांगितले. केजरीवाल यांच्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरु असताना इडीने हा दावा केला आहे.

न्यायालयाने तिहार तुरुंग अधिकाऱ्यांना अरविंद केजरीवाल यांच्या आहाराचा अहवाल सादर करण्यास सांगितले. सुनावणीदरम्यान, ईडीने दावा केला की केजरीवाल, ज्यांना घरी शिजवलेले जेवण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ते वैद्यकीय कारणास्तव जामीनासाठी एक आधार बनवण्यासाठी जास्त साखर असलेले अन्न ग्रहण करत आहेत.
अरविंद केजरीवाल हे मधुमेह मेल्तिस टाईप II चे रुग्ण असूनही आणि अशा पदार्थांच्या सेवनाने साखरेची वाढ होते हे माहीत असूनही साखर, केळी, मिठाई, पुरी, बटाटा भाजी सारख्या पदार्थांचे जाणीवपूर्वक नियमित सेवन करत असल्याचे वकिलांनी सांगितले. केवळ वैद्यकीय कारणास्तव न्यायालयाकडून सहानुभूतीपूर्वक वागणूक मिळावी, यासाठी हे सगळे केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा..

भगवी वस्त्रे परिधान केल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला, शाळेच्या मुख्याध्यापकांवर गुन्हा

राज कुंद्रा यांची संपत्ती जप्त, शिल्पा शेट्टीचा फ्लॅटही घेतला ताब्यात!

काँग्रेसला अमेठीत दणका; काँग्रेसचे प्रदेश सहसंयोजकांच्या हाती ‘कमळ’

इम्रान खान यांनी लष्करप्रमुखालाच धमकावले …तर सोडणार नाही!

केजरीवाल यांच्या वैद्यकीय अहवालाचा हवाला देत ईडीने सांगितले की, केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेची पातळी १ एप्रिल रोजी १३९ mg/dl होती. ज्या दिवशी त्यांना तिहार तुरुंगात आणण्यात आले होते. इडीने सांगितले की १४ एप्रिल रोजी सकाळी २७६ mg/dl नोंदवले गेले.
केजरीवाल यांच्या वकिलाने सांगितले की, ईडीकडून केवळ प्रसिद्धीसाठी अशी विधाने केली जात असल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने केजरीवाल यांनी तुरुंगात खात असलेल्या अन्न पदार्थांची यादी मागवली. न्यायालय शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी सुरू ठेवणार आहे.

Exit mobile version