मंगळवार, १ फेब्रुवारी रोजी मोदी सरकारने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी लोकसभेत हा अर्थसंकल्प सादर केला. आर्थिक क्षेत्रातील अनेख तज्ञांनी या अर्थसंकल्पाचे कौतुक केले असले तरीदेखील या अर्थसंकल्पाबाबत अनेक राजकीय हेतूने प्रेरित अशा टीका होताना दिसत आहेत.
वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध लोक या अर्थसंकल्पावर आपले मत नोंदवताना दिसत आहे. तर अनेक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी ‘मुंबईवर अन्याय केला’, ‘महाराष्ट्राला काहीच दिले नाही’, ‘मध्यमवर्गाला काही दिलासा दिला नाही’ अशा प्रकारचा आरोप करताना दिसत आहेत. या सर्वांवर मराठीतील प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी टीका केली आहे. कौशल यांनी फारच उपरोधिक अशाप्रकारे या सर्व टीकाकारांवर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा:
मुंबई पालिकेस दिवाळखोरीकडे नेणारा अर्थ (?) संकल्प!
U19 WC: भारताचे निर्विवाद ‘यश’! ऑस्ट्रेलियाला ‘धुल’ चारत अंतिम फेरीत धडक
निवडणूका डोळ्यासमोर ठेवून मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात ‘भरीव’ तरतुदी
‘हा तर कॉन्ट्रॅक्टरची धन करणारा महापालिकेचा अर्थसंकल्प…’
कौशल इनामदार यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक खात्यावर पोस्ट करताना, ‘या अर्थसंकल्पात मुंबईत राहणाऱ्या मराठी संगीतकारांसाठी काहीही तरतूद नाही’ असा खोचक टोला लगावला आहे. तर याच कारणाने अर्थसंकल्पाने आपली निराशा केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
विनाकारण अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्या सर्वांसाठी ही सणसणीत चपराक मानली जात आहे. इनामदार हे समाज माध्यमांवर सक्रिय असून कायमच सामाजिक राजकीय विषयांवर आपली मते मांडत असतात. तसेच ते आपल्या अशा खास शैलीसाठीही चांगलेच प्रसिद्ध आहेत.