ममता जी ‘कौन सा धर्म गंदा है’?

भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांचा सवाल 

ममता जी ‘कौन सा धर्म गंदा है’?

पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी सोमवारी (३१ मार्च) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आणि रेड रोड येथे ईद-उल-फित्रच्या उत्सवादरम्यान त्यांनी “प्रक्षोभक भाषण” दिल्याचा आरोप केला. शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि  वादग्रस्त विधाने केल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री बॅनर्जी यांना ‘कौन सा धर्म गंदा है’?, असा सवालही केला.

कलकत्ता खिलाफत समितीने रेड रोडवर आयोजित केलेल्या ईद कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी भाजपावर  राजकीय फायद्यासाठी हिंदू धर्माची बदनामी करत असल्याचा आरोप केला. तसेच त्यांनी आपल्या भाषणात ‘गंदा धर्म’ (घाणेरडा धर्म) या शब्दाचा उल्लेख केला. मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्या या वक्तव्यानंतर भाजपाकडून जोरदार टीका केली जात आहे.

शुभेंदू अधिकारी ट्वीटकरत म्हणाले, तुमच्या अनाकलनीय उर्दू भाषेने रेड रोडवरील मुस्लिम समुदायाला खूश करण्यासाठी, तुम्ही ‘गंदा धर्म’ किंवा ‘घाणेरडा धर्म’ला मानत नाही असे विधान केले. तुम्ही विशेषतः कोणत्या धर्माचा उल्लेख करत होता?, सनातन हिंदू धर्म?, असा सवाल शुभेंदू अधिकारी यांनी उपस्थित केला. तसेच ईद-उल-फित्रच्या निमित्ताने तुम्ही रेड रोडवर कोणत्या प्रकारचे प्रक्षोभक भाषण दिले?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले,  तुम्ही ईद शब्दापेक्षा ‘दंगा’ आणि ‘दंगली हे’ शब्द जास्त उच्चारले. तो धार्मिक कार्यक्रम होता की राजकीय कार्यक्रम?, समुदायांमध्ये द्वेष निर्माण करण्याच्या हेतूने तुम्ही जाणूनबुजून द्वेष का पसरवत होता?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तुम्ही धर्माला शस्त्र बनवत आहात. पण ते लवकरच तुमच्यावर हल्ला करेल, असे अधिकारी म्हणाले.

हे ही वाचा : 

‘नीती एनसीएईआर राज्य आर्थिक मंच’ पोर्टल लॉन्च होणार

दहशतवादी हाफिज सईदच्या जवळच्या सहकाऱ्याची कराचीत गोळ्या घालून हत्या

झोपताना मोबाईल बघताय, निद्रानाश होणारच

व्हायरल गर्ल मोनालिसाला ऑफर देणारा दिग्दर्शक निघाला बलात्कारी

भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनीही मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्यावर टीका केली. ट्वीटकरत ते म्हणाले, “पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी सनातन धर्म हा ‘गंडा धर्म’ आहे का?. त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिंदूविरोधी दंगली होऊनही, हिंदूंची थट्टा करण्याचे आणि त्यांच्या श्रद्धेचे उल्लंघन करण्याचे धाडस त्यांच्यात आहे. यावेळी ईद साजरी करण्यासाठी असलेल्या धार्मिक व्यासपीठावरून त्यांनी पुन्हा एकदा मुस्लिमांना हिंदूंना लक्ष्य करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे, असे अमित मालवीय म्हणाले.

Exit mobile version