केबीसीच्या २१ वर्षांच्या प्रवासाच्या आठवणींनी बिग बी भावूक

केबीसीच्या २१ वर्षांच्या प्रवासाच्या आठवणींनी बिग बी भावूक

सोनी टीव्हीवरील घराघरात पोहोचलेला आणि लोकप्रिय ठरलेला कार्यक्रम म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाने एक महत्त्वाचा आणि मैलाचा टप्पा गाठला आहे. नुकताच या कार्यक्रमाचा १ हजाराव्या एपिसोडचे शुटींग पार पडले आहे. तसेच कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाला २१ वर्षे पूर्ण झाले आहेत.

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या विशिष्ट संवादशैलीचा वापर करून आणि अनुभवाच्या मदतीने या कार्यक्रमाची एक वेगळीच ओळख बनवून आणि टिकवून ठेवली आहे. या १ हजाराव्या एपिसोडला अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन आणि नात नव्या नवेली नंदा यांनी उपस्थिती दर्शवली आहे.

हे ही वाचा:

तिजोरीत पैसा नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही

भाईंदरमध्ये फेरीवाल्याकडून पालिका अधिकाऱ्यावर रॉडने हल्ला

महाराष्ट्राची डोकेदुखी वाढली! साऊथ आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

मथुरामध्ये जमावबंदी! कृष्ण जन्मभूमीवरील मशिदीचा वाद पुन्हा येणार ऐरणीवर?

यादरम्यान श्वेता बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांना हा १ हजारावा एपिसोड आहे तर तुम्हाला कसे वाटत आहे, असा प्रश्न विचारला आहे. त्यावर असे वाटते की संपूर्ण जग बदलले आहे, असे अमिताभ यांनी सांगितले. तसेच अमिताभ हे भावूकही झाले होते. हा खेळ अजून संपलेला नाही, असेही अमिताभ यांनी सांगीतले.

महानायक अमिताभ बच्चन यांनी सुरुवातीपासून या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. काही काळ अभिनेता शाहरुखनं यानेही या सूत्रसंचालनाचा प्रयत्न केला मात्र त्याला इतकी लोकप्रियता मिळाली नाही. त्यानंतर अमिताभ यांनी या कार्यक्रमाला एका वेगळ्याच उंचीवर नेले असून अजूनही त्याचा टीआरपी इतर मालिकांपेक्षा सर्वाधिक आहे.

Exit mobile version