‘कटारिया’ काळजात घुसली

‘कटारिया’ काळजात घुसली

टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण आफ्रिका संघावर ४-३ अशी मात केली आहे. भारताकडून वंदना कटारिया हिने तीन गोल करत हॅटट्रिक नोंदवली. भारताकडून ही एक महत्त्वाची खेळी ठरली आहे. त्यामुळे भारतीय महिला संघाचे स्पर्धेतील आव्हान टिकून राहिले आहे.

शनिवार, ३० जुलै रोजी भारतीय महिला हॉकी संघाचा ग्रुप ए मधील पाचवा सामना रंगला. दक्षिण आफ्रिकन महिला संघ विरोधात हा सामना होता. भारतीय संघासाठी हा करो या मरो पद्धतीचा सामना होता. कारण जर भारतीय संघ हा सामना हरला असता तर यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार होते.

पण अतिशय अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने विजयश्री खेचून आणली आहे. भारतीय महिला हॉकीची स्टार खेळाडू वंदना कटारिया ही या विजयाची शिल्पकार ठरली. वंदना कटारिया हिने तीन गोल करत सामन्यात हॅट्रिक नोंदवली. ऑलिम्पिक स्पर्धेत हॅट्ट्रिक नोंदवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. पण त्याचवेळी भारताची बचाव फळी ही भारतीय संघासाठी एक चिंतेची गोष्ट ठरत आहे. दक्षिण अफ्रिके विरूद्धच्या या सामन्यात घेतलेली बढत भारतीय संघाला टिकवता आली नाही. त्यामुळे बचाव फळी वर भारतीय संघाला विशेष काम करावे लागणार आहे.

हे ही वाचा:

बेन स्टोक्सचा क्रिकेटला अलविदा?

चीन आज सैन्य मागे घेणार?

सर्वसामान्यांचे नेते गणपतराव देशमुख यांचे निधन

पॅकेजच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी वाजवली जुनीच टेप! म्हणाले…

भारतीय संघाने आपल्या पहिल्या तीन सामन्यात नेदरलॅंडकड्स, जर्मनी आणि ग्रेट ब्रिटन या तीन संघांच्या विरोधात पराभव पत्करला. पण त्यानंतर आता भारतीय संघाला विजय सुर गवसला आहे. आयर्लंड आणि दक्षिण अफ्रिका संघाला पराभूत करत भारतीय संघाने आपले स्पर्धेतले आव्हान बळकट केले आहे. आज ग्रेट ब्रिटन विरुद्धच्या सामन्यात आयर्लंड संघ हरला तर भारताचे उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित होणार आहे.

Exit mobile version