केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजे यूपीएससीच्या परिक्षांचे निकाल मंगळवारी लागले. त्यात ठाण्याची काश्मिरा संखे महाराष्ट्रातून पहिली आली.
काश्मिराने पहिल्या १०० जणात २५वे स्थान मिळविले. काश्मिरा ही पेशाने डॉक्टर असून याआधी तिने दोन वेळा या परीक्षेत यश मिळविण्यासाठी प्रयत्न केले पण तिला प्राथमिक परिक्षेच्या पलिकडे पोहोचता आले नव्हते. पण तिसऱ्या प्रयत्नात मात्र तिने यश मिळविले आहे.
हे ही वाचा:
भारताचा ऑलिम्पिक सुवर्णवीर नीरज चोप्रा भालाफेकीत जगात पहिल्यांदा ठरला अव्वल
ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अल्बानीस म्हणाले, मोदी म्हणजे ‘द बॉस’
‘आपला’ तो बाब्या’ दुसऱ्या’चं ते कार्ट असं कसं चालेल?
कंटेनरचा ब्रेक फेल, सहा कारना धडक, १ ठार
ती म्हणाली की, पहिल्या दोन प्रयत्नांत मला अगदी थोडक्यात अपयश आले. पण तिसऱ्या प्रयत्नात मी त्या चुका टाळल्या. मुख्य परीक्षेसाठी मी १४-१५ तास अभ्यास केला. लिहिण्याचा खूप सराव केला. सादरीकरणावर भर दिला. लहानपणापासून आयएएस बनण्याचे तिचे स्वप्न होते.
काश्मिराबरोबरच महाराष्ट्राच्या इतर मुलांनीही यश मिळविले. त्यात रिचा कुलकर्णी (५४), जान्हवी साठे (१२७), सौरभी पाठक (१५६), ऋषिकेश शिंदे (१८३), वागिशा जोशी (१९९), अर्पिता ठुबे (२१४), दिव्या गुंडे (२६५), कीर्ती जोशी (२७४), अमर राऊत (२७७), अभिषेक दुधाळ (२७८) यांनीही यश मिळविले आहे.