‘काश्मीर टायगर्सने’ घेतली कठुआ दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी !

भारतीय लष्कराची दहशतवाद्यांशी चकमक अजूनही सुरूच

‘काश्मीर टायगर्सने’ घेतली कठुआ दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी !

जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे सोमवारी (८ जुलै) भारतीय लष्कराच्या वाहनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ५ जवान हुतात्मा झाले. आता काश्मीर टायगर्स नावाच्या दहशतवादी संघटनेने कठुआ दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दहशतवादी संघटनेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांनी एम-४ असॉल्ट रायफल, ग्रेनेड आणि इतर शस्त्रे वापरली होती.

दहशतवादी संघटनेने आगामी काळात आणखी हल्ले करण्याचीही चर्चा आहे. काश्मीर टायगर्स या दहशतवादी संघटनेच्या वतीने २६ जून रोजी डोडा येथे मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांच्या मृत्यूचा हा बदला असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर गोळीबार केला आणि ग्रेनेडने हल्ला केला. या हल्ल्यात ५ जवानांना वीरगती प्राप्त झाली.

हे ही वाचा:

भुलवून रशियन सैन्यात भरती केलेल्या भारतीयांची होणार सुटका

कठुआमधील हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून; स्थानिकांनी मदत केल्याची माहिती

जम्मू काश्मीरमधील कठुआमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवानांना हौतात्म्य

मदनी यांच्या स्पष्टोक्तीनंतर तरी भाजपाचे डोळे उघडतील काय़?

भारतीय लष्कराची दहशतवाद्यांशी चकमक अजूनही सुरूच आहे. यासोबतच लष्कराने मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरुवातीच्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले आणि त्यानंतर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले, मात्र दहशतवादी जवळच्या जंगलात पळून गेले.

Exit mobile version