केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने काश्मीर मधील अन्यायकारक कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून या नंदनवनात विकासाची बाग फुलू लागली आहे. याच महिन्यात या गोष्टीला पुष्टी देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. २०२२ या वर्षात काश्मीरमध्ये पर्यटकांची रेकॉर्डब्रेक गर्दी अनुभवायला मिळाली आहे.
ज्या उन्हाळ्याच्या सुट्टीत काश्मीरमध्ये पर्यटकांचा ओघ वाढला आहे. जानेवारी २०२२ ते १५ मे २०२२ या कालावधीत तब्बल सात लाख पर्यटक काश्मीर मध्ये आले आहेत. जम्मू-काश्मीर पर्यटन विभाग आणि केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते. गेल्या जिल्ह्यात दहा वर्षात काश्मीरमध्ये आलेली ही सर्वाधिक पर्यटकसंख्या आहे. विशेष म्हणजे २०२१ च्या तुलनेत ही वाढ तब्बल चौपट आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत काश्मीरमध्ये केवळ १,२५,००० पर्यटक आल्याची नोंद झाली आहे.
हे ही वाचा:
ज्ञानवापी मशीद प्रकरणी उद्या न्यायालय देणार निकाल
संजय राऊतांवर मेधा सोमय्यांचा १०० कोटींचा दावा
अफगाणिस्तानात महिला टीव्ही अँकरचे ‘चेहरे’ गायब
इंग्लंडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांपुढे सोनिया गांधीनी पसरला पदर
जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत तब्बल सहा लाख लोकांनी काश्मीर मध्ये पर्यटन केल्याची नोंद आहे. यामध्ये गुलमर्ग श्रीनगर, पहलगाम अशा काश्मीर खोऱ्यातील प्रसिद्ध ठिकाणांचा समावेश आहे. यावेळी प्रेक्षकांच्या वास्तव्याचा कालावधी हा १० ते १५ दिवसांचा असतो. काश्मीरमध्ये कमी झालेल्या दहशतवादाचा हा परिणाम असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.