24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेष'द काश्मीर फाईल्सला' प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद! पहिल्या दिवशीच केली एवढी कमाई

‘द काश्मीर फाईल्सला’ प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद! पहिल्या दिवशीच केली एवढी कमाई

Google News Follow

Related

विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती लाभली असून पहिल्याच दिवशी या चित्रपटाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. शुक्रवार, ११ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी चित्रपटाने चांगली कामे केली आहे. प्रदर्शनाच्या दिवशीच या चित्रपटाने तब्बल साडे चार कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटासाठी हे खूपच मोठे यश मानले जात आहे.

द काश्मीर फाईल्स या चित्रपटातून विवेक अग्निहोत्री यांनी ९० च्या दशकात झालेल्या काश्मिरी पंडितांच्या शिरकांडाचे वास्तव मांडले आहे. या चित्रपटात अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, पुनीत इस्सार यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

हे ही वाचा:

आईची भेट, आशीर्वाद आणि खिचडीचा आस्वाद

भारत आणि श्रीलंकेची ‘गुलाबी’ कसोटी

राजधानी दिल्लीत अग्नितांडव; सात जणांचा मृत्यू

चुकून सुटलेले भारतीय क्षेपणास्त्र थेट घुसले पाकिस्तानमध्ये

या चित्रपटात कोणताही बडा अभिनेता नाही. विषयही ऐतिहासिक वास्तवाचा आहे. बॉलिवूडमधील कोणतीही बंदी हस्ती या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसली नाही अथवा चित्रपटाच्या रिऍलिटी कार्यक्रमांचेही फार काही मदत होताना दिसली नाही. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी स्क्रीन्स आणि शो कमी मिळाले. अवघ्या ५६१ स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.

पण असे असले तरी या सर्व अडचणींवर मात करत चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. प्रेक्षकांनीच या चित्रपटाला चांगला प्रतिसाद देत उचलून धरले आहे. त्यामुळे आता या चित्रपटाला अधिक स्क्रीन आणि शो मिळण्याची शक्यता आहे. IMDB सारख्या प्लॅटफॉर्मवरही या चित्रपटाला प्रेक्षकांनी १० पैकी १० रेटिंग दिले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा