‘काश्मीर फाईल्स’ पोहोचला १०० करोड क्लबमध्ये

‘काश्मीर फाईल्स’ पोहोचला १०० करोड क्लबमध्ये

‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचा तिकीटबारीवरचा धुमाकूळ अजूनही सुरू आहे. अवघ्या सात दिवसात या चित्रपटाने जगभरातून शंभर कोटींपेक्षा अधिक गल्ला कमावला आहे. तर त्यापैकी जवळपास ९७ कोटी ३० लाखांची कमाई ही भारतातून झाली आहे. या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता दुसऱ्या आठवड्यातही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करेल असा विश्वास तज्ञ व्यक्त करताना दिसत आहेत.

विवेक अग्निहोत्री लिखित-दिग्दर्शित काश्मीर फाईल्स हा चित्रपट यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करताना दिसत आहे. काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराचे वास्तव या चित्रपटातून उलगडण्यात आले आहे. ज्याला प्रेक्षकांची भरपूर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा कोणालाच या चित्रपटाकडून एवढी अपेक्षा नव्हती. पण देशभरातील प्रेक्षकांनी हा चित्रपट उचलून धरला. त्यामुळेच थिएटर मालकांनाही या चित्रपटाचे खेळ वाढवणे भाग पडले.

हे ही वाचा:

… म्हणून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ‘Y’ दर्जाची सुरक्षा

शिवसेनेचे सभासद कार्ड, पैसे उकळले मनसेच्या नावाने?

चिदंबरम म्हणाले, मी प्रियांका गांधींना आधीच सांगितले होते, पण…

‘पावनखिंड’ लवकरच ओटीटी प्लॅटफोर्मवर

प्रदर्शनाच्या दिवशी अवघ्या साडे सहाशेच्या आसपास स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण आज आठव्या दिवशी जवळपास चार हजार पेक्षा अधिक स्क्रीन्सवर हा चित्रपट दाखवला जात आहे. सकाळच्या पहिल्या शोपासून रात्रीच्या अखेरच्या शो पर्यंत जवळपास सगळे शो हाउसफुल झालेले पाहायला मिळत आहेत. एका मध्यम बजेटच्या हिंदी चित्रपटाला मिळालेले कदाचित आजवरच्या इतिहासातले हे सर्वाधिक यश असेल. या चित्रपटामुळे अक्षय कुमारच्या बच्चन पांडे या चित्रपटाच्या व्यवसायावरही परिणाम होऊ शकतो असे मत तज्ज्ञ व्यक्त करताना दिसत आहेत.

प्रेक्षकांच्या प्रतिसादात या भरभरून प्रतिसादासाठी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सर्व सिनेरसिकांच्या आभार मानले आहेत. चित्रपटाने आठवड्याभरात जगभरातून केलेल्या १०६ कोटी ८० लाखांची कमाई केली आहे. याबद्दल सांगताना विवेक अग्निहोत्री यांनी “आपल्या सर्वांना होळीच्या शंभर करोड शुभेच्छा” असे म्हटले आहे.

Exit mobile version