27 C
Mumbai
Thursday, November 21, 2024
घरविशेष'द काश्मीर फाइल्स' देशातील प्रमुख शहरांत हाऊसफुल्ल!

‘द काश्मीर फाइल्स’ देशातील प्रमुख शहरांत हाऊसफुल्ल!

Google News Follow

Related

द काश्मीर फाइल्सने तीन दिवसांतच चित्रपटगृहांत मुसंडी मारली आहे. देशातील सात प्रमुख शहरांमध्ये ४८० शो ची सर्व तिकिटे विकली गेली असून आणखी ५५० शो हे हाऊसफुल होणार आहेत. ऑपइंडियाने हे वृत्त दिले आहे.

देशभरात अगदी मोजक्या थिएटर्समध्ये हा चित्रपट रिलिज झाला असला तरी आज या चित्रपटाने देशभरात खळबळ उडवून दिली आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या या चित्रपटाने दोन दिवसांत घराघरात स्थान मिळविले आहे. काश्मीरमध्ये १९९०मध्ये काश्मिरी पंडितांच्या झालेल्या नृशंस हत्याकांडाचे विदारक वास्तव मांडणारा हा चित्रपट आहे. त्या अर्थाने तो वास्तवदर्शी चित्रपट आहे. पण लोकांनी या चित्रपटातील हे सत्य जाणून घेण्यासाठी चित्रपटगृहांवर धडक मारली आहे. बेंगळुरू, दिल्ली, मुंबई, हैदराहाद, चेन्नई, अहमदाबाद, पुणे या शहरांतील सर्व थिएटर हाऊसफुल्ल झाली आहेत. त्यामुळे स्वाभाविकच अनेकांची इच्छा असूनही चित्रपटाची तिकिटे मिळविणे अनेकांना मुश्किल बनले आहे.

चित्रपट ११ मार्चला रिलिज झाल्यानंतर लोकांचे व्हीडिओ शेअर होऊ लागले. चित्रपटात दाखविण्यात आलेल्या घटनांनी चाहत्यांची हृदयेही हेलावली. त्यामुळे रविवारी १३ मार्चला चित्रपटगृहे खच्चून भरली. प्रमुख शहरांतील थिएटरमधील ५०० शो फुल्ल झाले.

बेंगळुरूमध्ये दुपारी २ पर्यंत ५० शो हे हाऊसफुल झाले तर रात्रीचे ८० शोज फुल होण्याच्या मार्गावर होते. रात्री उशिरा होणाऱ्या शोची तिकिटे केवळ उपलब्ध होती. मुंबईतील १०० शोची तिकिटे बुक झालेली होती तर १५० शो हाऊसफुल होण्यासाठी सज्ज होते.

हे ही वाचा:

पुण्यातील पोलिसांनीच लुटले भिवंडीतील व्यावसायिकाचे ४५ लाख

देवेंद्र फडणवीसांची चौकशी हे सुडाचे राजकारणच

…नाहीतर मविआच्या मंत्र्यांनी गांधींचा फोटो काढून तिथे दाऊदचा फोटो लावावा!

मुंबईकर नव्या आयुक्तांना म्हणतायत ‘थोडा सास तो लेने दो सर’

 

हैदराबादमध्ये ४० शो फुल झाले तर २० शो १०० टक्के बुक होण्याच्या मार्गावर होते. चेन्नईत तर काळ्या बाजारात तिकिटे विकत घेतली जात असल्याचे वृत्त होते. पुण्यात रविवारी दुपारपर्यंत ४५ शो हाऊसफुल झाले तर आणखी ६० शोची तिकिटे लोकांनी विकत घेतली होती.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा