24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषरविवारच्या दिवशी काश्मीर फाईल्स ठरला बंपर हिट! केली इतक्या कोटींची कमाई...

रविवारच्या दिवशी काश्मीर फाईल्स ठरला बंपर हिट! केली इतक्या कोटींची कमाई…

Google News Follow

Related

विवेक अग्निहोत्री लिखित, दिग्दर्शीत द काश्मीर फाईल्स हा चित्रपट सध्या तिकीट बारीवर धुमाकूळ घालत आहे. शुक्रवार आणि शनिवारच्या धमाकेदार सादरीकरणानंतर रविवारी देखील या चित्रपटाचा बोलबाला दिसून आला. देशभरातील बहुतांश चित्रपट गृहांमध्ये या चित्रपटाचे शो हाऊसफुल होताना दिसले. तर परदेशातही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

रविवारी या चित्रपटाने १५.१० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या मुळे या चित्रपटाची पहिल्या वीकेंडची म्हणजेच चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून पहिल्या तीन दिवसांची कमाई २७ कोटी १५ लाख इतकी झाली आहे. शुक्रवार, ११ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी चित्रपटाने ३.५५ कोटींची कमाई केली. तर शनिवारी चित्रपटाने ८ कोटी ५० लाख रुपयांचा गल्ला जमवला. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून ही माहिती शेअर केली आहे.

हे ही वाचा:

कॅनडामध्ये अपघातात पाच विद्यार्थ्यांना मृत्यू  

त्या तरुणीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका! चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

जागतिक बाजारात भारतातल्या स्टीलला मोठी मागणी

फडणवीस यांना पाठवण्यात आलेली नोटीस ही आरोपी म्हणून नाही

द काश्मीर फाईल्स या चित्रपटाला यशस्वी करण्यात देशभरातील प्रेक्षकांचा खूप मोठा वाटा आहे. या चित्रपटाला सुरुवातीला जास्त स्क्रीन्स आणि शो मिळाले नव्हते. त्यासोबतच सुपरस्टार प्रभासच्या ‘राधे श्याम’ ची या चित्रपटाला स्पर्धा होती. त्यासोबतच अमिताभ बच्चन यांचा झुंड आणि गंगुबाई काठियावाडीची पण स्पर्धा होती. तरीदेखील प्रेक्षकांनी काश्मीर फाईल्स हा चित्रपट उचलून धरला. त्यामुळेच या चित्रपटाचे शो वाढवणे भाग पडले. पुढचे अनेक दिवस या चित्रपटाचा थिएटर्समध्ये बोलबाला असेल असे मत तज्ञ व्यक्त करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा