उत्तर प्रदेशातील कासगंज येथील चंदन गुप्ता हत्याकांडप्रकरणी लखनऊच्या एनआयए विशेष न्यायालयाची सुनावणी पार पडली. शुक्रवारी (३ जानेवारी) न्यायालयाने सर्व २८ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच दोषींना ५०,००० रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दरम्यान, यापूर्वी दोन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
जन्मठेपेची शिक्षा झालेल्या दोषींमध्ये वसीम जावेद, नसीम जावेद, मोहम्मद जाहिद कुरैशी उर्फ जाहिद उर्फ जग्गा, आसिफ कुरैली उर्फ हिटलर, असलम कुरैशी, अकरम, तौफीक, खिल्लन, शवाब अली खान, राहत, सलमान, मोहसिन, आसिफ जिमवाला, साकिब, बबलू, नीशू उर्फ जीशान, वासिफ, इमरान, शमशाद, जफर, साकिर, खालिद परवेज, फैजान, इमरान, साकिर, मोहम्मद आमिर रफी, सलीम और मुनाजिर रफी यांचा समावेश आहे. यापूर्वी एनआयए कोर्टाने नसरुद्दीन आणि असीम कुरेशी यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती.
न्यायालयाचे विशेष न्यायाधीश विवेकानंद शरण त्रिपाठी यांनी आरोपींना खून, खुनाचा प्रयत्न, दंगल आणि राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी दोषी ठरवले. न्यायालयाच्या निर्णयानंतर या आरोपींना न्यायालयीन कोठडीत घेऊन त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. भारतीय दंड संहितेच्या या कलमांव्यतिरिक्त सलीम, वसीम, नसीम, मोहसीन, राहत, बबलू आणि सलमान यांना शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. घटनेच्या वेळी हे शस्त्रे बाळगत होते.
हे ही वाचा :
छत्तीसगडमध्ये तीन नक्षलवाद्यांचा खात्मा
रोहित शर्मा टीममधून बाहेर, काय म्हणाला, ऋषभ पंत?
मी स्वतःसाठी काचेचा महाल नाही, तर गरिबांना घरे बांधली!
काश्मीरचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा पुनरुज्जीवित करण्यासाठी कटिबद्ध
दरम्यान, २६ जानेवारी २०१८ रोजी विश्व हिंदू परिषद, एबीव्हीपी आणि हिंदू वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी तिरंगा यात्रा काढली होती. ज्यामध्ये १०० हून अधिक लोकांनी तिरंगा घेवून सहभाग नोंदवला होता. मिरवणूक तहसील रोडवरील जीजीआयसीच्या गेटजवळ येताच सलीम, वसीम, नसीम आदींच्या टोळक्याने रस्ता अडवून मिरवणूक रोखली.