27 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरविशेष‘कारुळकर’ बनले वर्ल्ड कम्युनिकेशन फोरमचे सदस्यत्व मिळविणारे पहिले भारतीय दांपत्य

‘कारुळकर’ बनले वर्ल्ड कम्युनिकेशन फोरमचे सदस्यत्व मिळविणारे पहिले भारतीय दांपत्य

Google News Follow

Related

कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी तसेच प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष शीतल जोशी-कारुळकर यांना वर्ल्ड कम्युनिकेशन फोरम असोसिएशनचे (डब्ल्यूसीएफए) कॉर्पोरेट सदस्यत्व प्रदान करण्यात आले असून हा सन्मान प्राप्त होणारे ते जागतिक स्तरावरचे पहिलेच भारतीय दांपत्य आहे. दावोस, स्वीत्झर्लंड येथे प्रतिवर्षी होणाऱ्या या संस्थेच्या परिषदेत उपस्थित राहण्याची संधी कारुळकर दांपत्याला मिळणार आहे.

जाहिरात, डिजिटल मार्केटिंग, मीडिया, पीआर असे कम्युनिकेशन्स जगतातील नामवंत या परिषदेत उपस्थित असतील. ही परिषद दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही २६ जानेवारीच्या आसपास प्रतिवर्षी ज्या सभागृहात भरते, तिथेच भरत असते. फक्त निमंत्रितांना या परिषदेचे सदस्यत्व देण्यात येते आणि त्यांना या जागतिक परिषदेला उपस्थित राहता येते.

हे ही वाचा:

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी शाळांना हवाय वेळ

स्पुतनिकची पहिली खेप आज भारतात पोहोचणार

मुंबई महापालिका निवडणुका होणार! निवडणूक आयोगाचा हिरवा कंदिल

काँग्रेस नेत्याची आता थेट भोसले राजघराण्याकडून वसूली

एमॉटिकॉन्सचे प्रणेते प्रो. स्कॉट फालमन, केचम या जगातील मोठ्या डिजिटल मार्केटिंग कंपनीचे जागतिक अध्यक्ष जानी कॅटलफॅमो, संपर्क क्षेत्रातील स्वतंत्र सल्लागार कंपनी असलेल्या हिल प्लस नॉल्टनचे जागतिक अध्यक्ष मॅक्झिम बेहार, दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकचे जनसंपर्क मंत्री फेथ मुथांबी, आयसीसीआरचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आणि संयुक्त अरब अमिरातीच्या सांस्कृतिक, जनसंपर्क तसेच शिक्षण मंत्री नूरा बिन्त अल काबी हे मान्यवरांनी या वार्षिक परिषदेला उपस्थित राहून या संमेलनाची शोभा वाढवली आहे.

प्रशांत कारुळकर हे या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून वर्ल्ड कम्युनिकेशन फोरम असोसिएशनच्या कार्याला प्रथम भारतात व नंतर जागतिक स्तरावर नवी दिशा देतील. त्यातून हा मंच नवनव्या संधींसाठी खुला करण्याचा आणि नवे व्यापारी करार करण्यासाठी प्रशांतजी सहाय्य करतील, तर शीतल कारुळकर या मंचाच्या माध्यमातून संपर्क उद्योगात महिलांचा सहभाग वाढवतील. शिवाय, ‘न्यूज डंका’ सारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे प्रतिनिधित्वही या दांपत्यामुळे जागतिक स्तरावर केले जाणार आहे.

प्रशांत आणि शीतल कारुळकर यांनी या संस्थेच्या सदस्यत्वाचे प्रमाणपत्र डब्ल्यूसीएफएच्या कार्यकारिणीचे नियंत्रक योगेश जोशी यांच्याकडून मिळाल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा