27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषकारुळकर प्रतिष्ठानच्या समाजकार्याचे आकाशवाणीकडून कौतुक

कारुळकर प्रतिष्ठानच्या समाजकार्याचे आकाशवाणीकडून कौतुक

Google News Follow

Related

एफएम वाहिन्यांच्या धबडग्यातही आकाशवाणीचा एक वेगळा श्रोतृवर्ग अजूनही कायम आहे. आकाशवाणीवर होणाऱ्या कार्यक्रमांचा, मुलाखतींचा वेगळा दर्जा आजही टिकून आहे. एकेकाळी प्रत्येक घरातील सकाळ ही आकाशवाणीवरील गाण्यांनीच होत असे. तो शिरस्ता आजही अनेक घरात कायम असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे आकाशवाणीवरील मुलाखतीतून एखाद्या कार्याची घेतली गेलेली दखल म्हणजेच त्या कार्याला मिळालेली जनतेची पोचपावती असेच मानले जाते. कारुळकर प्रतिष्ठानने कोरोनाच्या या संकटकाळात केलेल्या कार्याची दखल आकाशवाणीने घेतली. आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरील ‘बलसागर भारत होवो’ या कार्यक्रमात रश्मी म्हांब्रे यांनी प्रशांत कारुळकर यांची मुलाखत घेत प्रतिष्ठानचे समाजकार्य अनेकांपर्यंत पोहोचविले.

गेली दीड वर्षे कोरोनाच्या हाहा:कारामुळे पोळलेल्या जनतेला कारुळकर प्रतिष्ठानने मदतीचा हात पुढे करत दिलासा दिला. २४ मार्च २०२०पासून सगळीकडे लॉकडाऊन लागल्यानंतर प्रतिष्ठानच्या लक्षात आले की, हायवेवर अशी अनेक कुटुंबे प्रतीक्षा करत आहेत ज्यांना दोन दोन दिवस जेवण मिळालेले नाही. सगळ्या स्वयंसेवकांना प्रतिष्ठानने ऍक्टिव्ह केले. २५ मार्चपासून या सगळ्यांना जेवण द्यायला सुरुवात केली. औषधे, रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. आदिवासी पाड्यात अन्नधान्य उपलब्ध करून दिले. केंद्र, राज्य सरकारकडून मदत दिली जात होती, पण सगळीकडे त्यांना पोहोचणे शक्य नव्हते. मग गावोगावी, पाड्यापाड्यात आमचे स्वयंसेवक उभे केले. जिल्हा, तालुका, गाव, पाडा असे चार विभाग करून त्यांच्या आवश्यक गरजा पूर्ण केल्या.

हे ही वाचा:
कोविडमुळे अर्धमेले झालेलो…जलप्रलयाने सुपडा साफ झाला

दैनिक भास्कर समूहावर आयकर विभागाचे छापे

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबावरील कर्ज भाजपाने फेडले

परमबीर सिंग यांच्यासह ८ वरिष्ठ पोलिसांवर गुन्हा दाखल

यंदा मार्चला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्यावेळी रुग्णालय उपलब्ध करून देणे हे खूप मोठे आव्हान होते. रोज प्रतिष्ठानकडे ४०० फोन येत. रुग्णालय मिळत नव्हती. अनेकांना ओळखीच्या जोरावरही रुग्णालय मिळणे कठीण जात होते. ऑक्सिजनची पातळी घसरलेली होती, कोविड स्कोअर घसरला आहे, एचआरसीटी स्कोअर २० किंवा १८ आहे म्हणजे अगदी गंभीर स्थिती आहे, त्यांना आमची यंत्रणा उपलब्ध करून रुग्णालयात जागा मिळवून दिली. राज्य सरकारचा जीआर आला होता उद्योगधंदे सुरू करण्यासाठी. पण त्या उद्योगांपर्यंत कसे पोहोचायचे हा कामगारांसमोरचा प्रश्न होता. ती व्यवस्था करून दिली. काही लोक निर्बंधांमुळे अडकले होते. त्यांना पास उपलब्ध करून दिले किंवा आमच्या गाड्यांमधून त्यांना इच्छित स्थळी पोहोचविण्यात आले. लोकांच्या गरजा खूप होत्या. अनेक लोक विविध व्याधींनी ग्रस्त होते त्यांच्या वैद्यकीय गरजा कोरोनापेक्षाही अधिक गंभीर होत्या. त्यासाठी आवश्यक ती वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली.

प्रतिष्ठानचे हे कार्य तेलंगण, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आज सुरू आहे. १९६९मध्ये महाराष्ट्रात कमलाबाई कारुळकर यांनी प्रतिष्ठानची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर प्रशांत कारुळकर यांच्या वडिलांनी या कार्यात स्वतःला झोकून दिले. प्रशांत कारुळकर यांची पिढी आज ते कार्य पुढे नेत आहे. आज जवळपास १५०० लोक या कार्यात जोडले गेले आहेत. स्वेच्छेने त्यांनी या कामाला झोकून दिले आहे. आपापल्या क्षेत्रात काम करत असताना कारुळकर प्रतिष्ठानचे कामही ते पाहतात.

आता अगदी शेवटच्या स्तराला असलेल्या माणसाला आर्थिकदृष्ट्या उभे करणे ही मोठी जबाबदारी आहे, असे प्रतिष्ठानला वाटते. पुढील तीन वर्षांत १० हजार नोकऱ्या निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा त्यांनी बाळगली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा