आंतरराष्ट्रीय जल दिनानिमित्त नद्यांची स्वच्छता; कारूळकर प्रतिष्ठानचा उल्लेखनीय उपक्रम

आंतरराष्ट्रीय जल दिनानिमित्त नद्यांची स्वच्छता; कारूळकर प्रतिष्ठानचा उल्लेखनीय उपक्रम

विविध सामाजिक कार्ये करणाऱ्या कारूळकर प्रतिष्ठानने आंतरराष्ट्रीय जल दिनानिमित्त नद्यांच्या साफसफाईचे काम हाती घेतले आहे. सामाजिक कार्यात कार्यरत असणाऱ्या कारूळकर प्रतिष्ठानने पर्यावरणीय क्षेत्रात देखील ठसा उमटवला आहे.

कारूळकर प्रतिष्ठानच्या कामाची सुरूवात १९६९ मध्ये झाली. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरील झरी याठिकाणी एका शाळेसाठी कारूळकर प्रतिष्ठानचे विद्यमान प्रमुख प्रशांत कारूळकर यांच्या आजी श्रीमती कमलाबाई कारूळकर यांनी जामिन दान केली होती.

हे ही वाचा:

फोन टॅपिंगमुळे उघड झाला पोलिसांच्या बदल्यांचा धंदा

गृहमंत्र्यांची सीबीआय चौकशी अटळ?

गोवा नगरपालिका निवडणुकीत भाजपा दणदणीत विजयी

या घटनेला ५२ वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून कारूळकर प्रतिष्ठानने जागतिक जल दिनानिमित्त २२ मार्च २०२१ रोजी पाणी साठ्यांच्या स्वच्छता मोहिमेला सुरूवात केली. ग्रामीण भागातील तलाव, नद्या आणि विहिरी या जल साठ्यांना अतोनात महत्त्व असते. त्यामुळेच या जलसाठ्यांच्या स्वच्छतेचे कार्य कारूळकर प्रतिष्ठानने हाती घेतले आहे. त्याबरोबरच जागतिक जल दिनाचे निमित्त साधून कारूळकर प्रतिष्ठान परिवाराने पाणी आणि वातावरणाच्या संरक्षणाची शपथ घेतली आहे.

पर्यावरण, शिक्षण आणि रोजगार क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या कारूळकर प्रतिष्ठानने विविध उपक्रमांद्वारे आपला ठसा उमटवला आहे. यापुर्वी अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण निधीसाठी देखील प्रशांत कारूळकर यांनी दान दिले होते.

Exit mobile version