ही मदत नाही तर जबाबदारी

ही मदत नाही तर जबाबदारी

काही दिवसांपूर्वी पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील गावंच्या गावं उध्वस्त झाली. अनेक संसार उघड्यावर आले. अशा विस्कटलेल्या सर्वांना सावरण्यासाठी समाजातील अनेक हात पुढे येत आहेत. त्यातच कारूळकर प्रतिष्ठान आणि ‘न्यूज डंका’ देखील आपला खारीचा वाटा उचलत आहेत.

या मदत कार्यात दोन पद्धतीचा अवलंब केला जात आहे. मदत घेऊन जाणाऱ्या लोकांसोबत मदत पाठवली जात आहे. तर आपले स्वतःचे मदतीचे ट्रकही पाठवले जात आहेत. पती, पत्नी आणि दोन मुले या चार जणांच्या कुटुंबाला पुरेल अशा प्रकारची किट्स बनवण्यात आली आहेत. ज्यामध्ये कपडे, तेल, तांदूळ, डाळी, बिस्किटे, मॅगी, असे अत्यावश्यक स्वरूपातली पदार्थ आहेत. या मदतीतून दररोज ४०० कुटुंबांना आधार मिळत आहे.

हे ही वाचा:

१५ ऑगस्ट पर्यंत मुख्यमंत्री भेटले नाहीत तर ‘मातोश्री’ समोर आत्मदहन

‘या’ संकेतस्थळांवर बघता येईल बारावीचा निकाल

पंतप्रधानांनी लॉन्च केलेले ई-रुपी आहे तरी काय?

पूजा चव्हाण प्रकरणात मिळाला मोठा पुरावा! संजय राठोडांच्या अडचणीत वाढ?

या संपूर्ण कार्यात ‘न्यूज डंका’ तर्फे मोलाचा हातभार लावला गेला आहे. ‘न्यूज डंका’ च्या सर्व पत्रकार आणि कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात आर्थिक योगदान दिले आहे. ‘न्यूज डंका’ चे मुख्य संपादक दिनेश कानजी यांनी या विषयी बोलताना असे सांगितले की, ‘ही मदत नसून समाजाप्रती असलेली आमची जबाबदारी आहे.’

तर कारुळकर प्रतिष्ठानचे प्रशांत कारुळकर यांनी सांगितले की, ‘पूर आणि दरडग्रस्तांना मदत पोहोचवण्यासाठी संकट कोसळल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच प्रतिष्ठानने झोकून दिले. दरडग्रस्तांच्या जखमा अजूनही भळभळत्या असल्याने कॅमेराचा लखलखाट करून दिखावा करण्याचे आम्ही जाणीवपूर्वक टाळले. पूरग्रस्तांच्या दैवदुर्दशा चव्हाट्यावर आणण्याची आमची इच्छा नव्हती. आम्ही मूळचे कोकणचे सुपुत्र. त्यामुळे ही आपत्ती माझ्या घरच्या माणसांवर आलेली आहे. त्यामुळेच मदत करण्याचा निश्चय अधिक बळकट आहे.

पण ही तात्पुरती मलमपट्टी आहे.हे काम इथे थांबणार नाही प्राथमिक आणि तातडीची गरज पूर्ण झाल्यानंतर प्रतिष्ठान आणि ‘न्यूज डंका’ तर्फे गावांना पुन्हा उभारण्याचे शिवधनुष्य उचलले जाईल.

Exit mobile version