राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींपैकी एक असलेल्या रोहित राठौरच्या घरावर महानगरपालिकेने गुरुवारी बुलडोझर चालवत कारवाई केली.आरोपी रोहित राठौरच्या खातीपुरा येथील घर बेकादेशीरपणे बांधण्यात आल्याचे जयपूर ग्रेटर महानगरपालिकेने सांगत कारवाई केली आहे.
राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी यांच्यावर ५ डिसेंबर रोजी गोळीबार करण्यात आला होता.या हत्याकांडात आरोपी रोहित राठोड,नितीन फौजी आणि त्यांचा साथीदार उद्धम यांचा समावेश होता. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणि राजस्थान पोलिसांच्या संयुक्त कारवाईत या तिघांना ९ डिसेंबर रोजी चंदीगडमध्ये अटक करण्यात आली होती.
हे ही वाचा:
ठाकरे गटाला २३ जागा मग आम्हाला काय? काँग्रेसचा सवाल!
दहशतवादी हाफिज सईदला आमच्या स्वाधीन करा!
पुण्यात दोन गॅंगनी एकमेकांविरोधात उगारले कोयते!
दरम्यान,करणी सेनेच्या प्रमुखावर ५ डिसेंबर रोजी जयपूरमधील त्यांच्या घरात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या आणि ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असलेला गँगस्टर रोहित गोदारा याने गोगामेडीच्या जबाबदारी घेतली होती.तशी फेसबुक पोस्ट रोहित गोदाराने केली होती.
आरोपींना अटक केल्यानंतर नितीन फौजी याने रोहित गोदरा आणि त्याचा जवळचा साथीदार वीरेंद्र चरण यांच्या सांगण्यावरून ही हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली.इंडिया टुडेच्या बातमीनुसार, करणी सेनेच्या प्रमुखाची हत्या जमिनीच्या वादातून झाली असावी असे सांगितले जात आहे.सुखदेवसिंग गोगामेडी हे रोहित गोदाराच्या जमिनीच्या वादात सामील असल्याची माहिती आहे.