करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) हरियाणा आणि राजस्थानमधील ३१ ठिकाणी छापे टाकत आहे.गृह मंत्रालयाने (MHA) हत्येचा तपास नुकताच एनआयएकडे सोपवला होता. या हत्येमध्ये हाय-प्रोफाइल गुंडांचा सहभाग लक्षात घेऊन तपास यंत्रणेकडे तपासाची जबाबदारी देण्यात आली होती.या प्रकरणाचा ताबा घेतल्यानंतर एनआयएने संशयितांची चौकशी केली. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे छापे टाकण्यात येत आहेत.
राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची जयपूर येथील त्यांच्या घरी ५ डिसेंबर रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती . करणी सेनेच्या प्रमुखाची हत्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. या घटनेनंतर लगेचच लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असलेला गँगस्टर रोहित गोदारा याने फेसबुक पोस्टमध्ये गोगामेडी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली.
हे ही वाचा:
अदानींना ‘सर्वोच्च’ दिलासा; हिंडेनबर्ग प्रकरणचा तपास सेबीकडेच
रामनगरी होणार अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र
ओवैसी यांच्या भडकवणाऱ्या वक्तव्याचा भाजपा नेत्याकडून समाचार
बैरूतमध्ये स्फोट घडवून हमासच्या उपप्रमुखाला उडवले!
हत्येच्या काही महिन्यांपूर्वी रोहित गोदाराने दुबईच्या एका नंबरवरून सुखदेव सिंग गोगामेडी यांना धमकीचा फोन केला होता.करणी सेना प्रमुख हत्या प्रकरणी दिल्ली गुन्हे शाखा आणि राजस्थान पोलिसांच्या संयुक्त कारवाईत, दोन नेमबाज, रोहित राठौर आणि नितीन फौजी आणि एक सहकारी, उधम, यांना १० डिसेंबर रोजी चंदीगड येथून अटक करण्यात आली होती.
जयपूर पोलिसांनी गोगामेडी हत्येचा कट रचणाऱ्या आणखी एका व्यक्तीलाही अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रामवीर जाट याने हत्येपूर्वी जयपूरमधील त्याचा मित्र फौजीसाठी योजना तयार केली होती. गोदाराचे जवळचे साथीदार वीरेंद्र चहान आणि दानाराम यांच्या संपर्कात होते, ज्यांच्या सांगण्यावरून ही हत्या करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले .गोगामेडी यांच्या निवासस्थानी पोलिसांशी झालेल्या गोळीबारात नवीन शेखावत हा हल्लेखोरही ठार झाला होता.