कर्नाटकातील दावणगेरे येथील एका ३८ वर्षीय महिलेच्या पतीने स्थानिक जामा मशिदीत तक्रार केल्यानंतर महिलेवर मशिदीबाहेर जमावाने हल्ला केला. महिलेला काठ्या आणि पाईपने मारहाण करण्यात आली. ही घटना व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करण्यात आली आणि नंतर ऑनलाइन प्रसारित करण्यात आली. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
ही घटना गेल्या आठवड्यात घडली आणि कॅमेऱ्यात कैद झाली. घरगुती वादामुळे मुस्लीम महिलेला मशिदीबाहेर मारहाण करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेचे नाव शबीना बानू आहे. ७ एप्रिल रोजी पिडीत शबीना बानूला तिचे नातेवाईक भेटण्यास आले होते. सुरवातीला नातेवाईक आपल्या घरी निघून जाऊ असे म्हटले होते मात्र, ते आपल्या घरी न जाता पिडीत शबीना बानूच्याच घरी थांबले.
याच दरम्यान, पिडीत शबीना बानूचा पती जमील अहमद शमीर घरी परतला आणि त्याने पत्नीच्या नातेवाईकांच्या उपस्थितीमुळे अस्वस्थ झाला. याबाबत त्याने संताप व्यक्त करत बेंगळुरूच्या तावरेकेरे येथील स्थानिक जामा मशिदीत गेला आणि त्याने त्याच्या पत्नीसह तिच्या नातेवाईक नसरीन आणि फयाजविरुद्ध तक्रार दाखल केली.
हे ही वाचा :
तेजस्वीना नेता मानल्यास काँग्रेसची अधोगती
काँग्रेस-राजद एकमेकांना कमजोर करतायत
बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांकडे सापडले टिफिन बॉम्ब, विजेच्या तारा, फटाके!
हरयाणातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी रॉबर्ट वाद्रा आता ईडीच्या फेऱ्यात
पतीच्या तक्रारीनंतर मशिदीने ९ एप्रिल रोजी शबीना बानूसह तिच्या नातेवाईकांना बोलावले. शबीना बानू येताच मशिदीबाहेर तिला काठ्या आणि पाईपने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ती गंभीर जखमी झाली.
या घटनेनंतर ११ एप्रिल रोजी पिडीत महिला शबीना बानूने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी मोहम्मद नियाज, मोहम्मद गौसपीर, चांद बाशा, इनायत उल्लाह, दस्तगीर आणि रसूल या सहा जणांना अटक केली. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.