लैंगिक छळप्रकरणी प्रज्वल रेवण्णा, वडिलांना कर्नाटक एसआयटीचे समन्स!

कर्नाटक सरकारने आदेश दिल्यानंतर कारवाई

लैंगिक छळप्रकरणी प्रज्वल रेवण्णा, वडिलांना कर्नाटक एसआयटीचे समन्स!

जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या लीक झालेल्या व्हिडिओंची चौकशी करत असलेल्या कर्नाटकच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) मंगळवारी प्रज्वल आणि वडिलांना चौकशीसाठी त्यांच्यासमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.हसनचे खासदार प्रज्वल आणि त्यांचे वडील होलेनरसीपूरचे आमदार एचडी रेवन्ना या दोघांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.

अश्लील व्हिडिओंची चौकशी करण्यासाठी कर्नाटक सरकारने एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. प्रज्वल या ३३ वर्षीय नेत्याने अनेक महिलांसोबत लैंगिक कृत्ये केल्याचा आरोप आहे. प्राथमिक तपासात हसनमध्ये आढळलेल्या पेन ड्राईव्हमध्ये काही सेकंदांपासून तर मिनिटांपर्यंतचे दोन हजार ९७६ व्हिडिओ आहेत. हे व्हिडीओ रेवण्णा यांच्या बेंगळुरू आणि हसन येथील निवासस्थानातील मोबाइल फोनवरून रेकॉर्ड केलेले आहेत, असे समजते.

सन २०१९ ते २०२२ या कालावधीत लैंगिक शोषण झाल्याचा आरोप त्यांच्या घरी काम करणाऱ्या एका महिलेच्या तक्रारीवर आधारित होता. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी लैंगिक छळ, मारहाण, गुन्हेगारी धमकावणे, विनयभंग आदी गुन्हे दाखल केले आहेत.

हे ही वाचा:

संपत्ती पुनर्वाटपाचे विचार बाळबोध आणि अज्ञानीपणाचे!

आघाडीची फळी कोलमडल्यामुळे पराभव, हार्दिक पांड्याची टीका!

भक्तांकडून दक्षिणा घेतल्याने तमिळनाडू पोलिसांकडून चार पुजाऱ्यांना अटक

दिल्ली, नोएडातील ५० हून अधिक शाळांना बॉम्बची धमकी!

गौडा कुटुंबाला व्हिडिओची माहिती होती, तरीही प्रज्वल रेवन्ना यांना उमेदवारी दिल्याच्या पक्षातील आरोपांदरम्यान, जेडी(एस)ने मंगळवारी हुबली येथे महत्त्वपूर्ण कोअर कमिटीच्या बैठकीत विद्यमान खासदाराला निलंबित केले. माजी मुख्यमंत्री आणि प्रज्वलचे काका एचडी कुमारस्वामी म्हणाले, जोपर्यंत एसआयटी आपला अहवाल सादर करत नाही तोपर्यंत हे निलंबन लागू राहील.

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या एक दिवसानंतर, रेवण्णा २७ एप्रिल रोजी जर्मनीला रवाना झाले. त्यांचे वडील एचडी रेवण्णा यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले की, जर मला चौकशीसाठी बोलावले गेले तर ते परत येतील.
एसआयटी सध्या महिलेने दाखल केलेल्या एफआयआर आणि लीक झालेल्या हजारो व्हिडिओंची चौकशी करत आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की समन्स बजावूनही ते एसआयटीसमोर हजर न झाल्यास त्यांना फरार घोषित केले जाईल.

तर, प्रज्वलला एसआयटी भारतात परतण्यास सांगेल. एसआयटी तपास लवकरच पूर्ण होईल आणि अशा प्रकरणांचा अहवाल १० ते १५ दिवसांत सादर केला जाईल, असे सोमवारी राज्याचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी सांगितले.
गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) एजीडीपी बीके सिंग यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीमध्ये दोन महिला पोलिस अधीक्षकांचा समावेश आहे. “तपास अधिकारी कथित सेक्स व्हिडिओ असलेले पेन ड्राइव्ह घेतील आणि ते फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पडताळणीसाठी पाठवतील. पुरावे गोळा करावे लागतील,’ असे गृहमंत्री म्हणाले.

एसआयटीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास सुरुवातीच्या टप्प्यात असून इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळा केले जात आहेत. “आमचे प्राथमिक कार्य महिलांना ओळखणे आणि त्यांना केसचा भाग म्हणून जबाब देण्याची विनंती करणे हे आहे. आम्ही किती महिलांची ओळख पटवली आणि किती जणांचा जबाब नोंदवला, हे आम्ही सांगू शकत नाही,’ असे एका तपास अधिकाऱ्याने सांगितले.

Exit mobile version