स्वतःच्या दुकानात हनुमान चालिसा वाजवणाऱ्या दुकानदाराला मारहाण झाल्यानंतर या प्रकरणी दुकानदारावरच गुन्हा दाखल करण्याची कारवाई कर्नाटक पोलिसांनी केली आहे. मारहाणी प्रकरणातील आरोपी सुलेमान याची आई मेहजबीन यांनी तक्रार दाखल केल्याने त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहजबीन यांनी १८ मार्च रोजी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मुकेशने तिच्या मुलाला व त्याच्या मित्रांना मारहाण केली होती. जवळच्या मशिदीत नमाजाचे पठण सुरू असताना मुकेशने मोठ्या आवाजात गाणे लावल्याने त्याबद्दल तिचा मुलगा आणि मित्रांनी जाब विचारला असता, मुकेशने त्यांना मारहाण केल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तिच्या तक्रारीच्या आधारे पोलिस न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार, न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, २७ मार्चर जी मुकेशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुलेमान आणि त्याच्या मित्रांनी दुकानदाराला मोठ्याने गाणे वाजवण्याबाबत जाब विचारला होता. या आवाजामुळे नमाज पठण करणाऱ्या सुमारे तीन हजार जणांना त्रास होत असल्याचे त्यांनी त्याला सांगितले होते. मात्र दुकानदार मुकेशने सुलेमान आणि त्याच्या मित्राला शिविगाळ करून त्याला मारहाण केली. पोलिसांनी अद्याप मुकेशला चौकशीसाठी बोलावलेले नाही. या प्रकरणी मुकेशवर भावना दुखावणे, शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणे अशा विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, या प्रकरणी सुलेमान, शानवाझ, रोहिथ, दानिश, तरुणा आणि अन्य आरोपींची जामिनावर सुटका झाली आहे.
हे ही वाचा..
जोस बटलरच्या १०० धावा विराटच्या ११३ धावांपेक्षा सरस!
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमाचे मराठी कलाकारांकडून कौतुक!
ठाकरे काँग्रेसच्या ‘चीन चीन चू’ धोरणाचा जाब विचारणार का?
पंतप्रधान मोदींचा गाझियाबादमध्ये दीड किलोमीटरचा मेगा रोड शो!
या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी भाजपच्या नेत्यांनी केली आहे. तर, मुकेशच्या सांगण्यानुसार, अजानची वेळ आहे, असे आरोपी सांगत होते. मुकेश त्यांना अजानला वेळ आहे, असे सांगत असतानाही त्यांनी त्याचे ऐकले नाही आणि त्याला मारहाण केली, असा मुकेशचा आरोप आहे.
भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी याबाबत काँग्रेस सरकारवर टीका केली आहे. मुख्य मुद्दा बाजूला राहील, अशा प्रकारे गुन्हा दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला. लोकांनी यात मध्यस्थी केली नसती तर हनुमान चालिसाचा मुद्दा समोर आलाच नसता, असा दावा त्यांनी केला आहे. १९ मार्च रोजी अनेक भाजप नेते आणि हिंदू संघटनांनी मुकेशला पाठिंबा देण्यासाठी बेंगळुरूत निदर्शने केली. त्यानंतर सुलेमान याच्या आईने मुकेशविरोधात तक्रार दाखल केली.