कर्नाटकचे आमदार जनार्दन रेड्डी यांचा भाजपमध्ये प्रवेश!

बीएस येडियुरप्पा आणि बीवाय विजयेंद्र यांच्या उपस्थित पक्षप्रवेश

कर्नाटकचे आमदार जनार्दन रेड्डी यांचा भाजपमध्ये प्रवेश!

खाण व्यवसायी आणि कर्नाटक राज्य प्रगती पार्टी (KRPP) चे एकमेव आमदार जी जनार्दन रेड्डी यांनी सोमवारी ( २५ मार्च) भाजप मध्ये प्रवेश केला.भाजपनेते बीएस येडियुरप्पा आणि बीवाय विजयेंद्र यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला.जी जनार्दन रेड्डी यांच्यासह त्यांच्या पत्नी अरुणा लक्ष्मी यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जनार्दन रेड्डी म्हणाले, आज मी माझा पक्ष भाजपमध्ये विलीन करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मला खूप आनंद झाला आहे की, मी तिसऱ्यांदा मोदींना पाठिंबा देण्यासाठी माझ्या घरी परतलो आहे. मी कोणत्याही अटीशिवाय पक्षात प्रवेश केला आहे. मला कोणत्याही पदाची गरज नाही, असे जनार्दन रेड्डी म्हणाले.

रेड्डी यांच्या भाजप प्रवेशावर बीएस येडियुरप्पा म्हणाले, “रेड्डींचा हा खूप चांगला निर्णय आहे. यामुळे आमचा पक्ष मजबूत होईल.आम्ही सर्व २८ जागा जिंकू.त्यांच्या पत्नी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करतो.

हे ही वाचा:

गदारोळानंतर काँग्रेसकडून सुनील शर्मा यांची उमेदवारी मागे!

भाजपने वरुण गांधी यांचे नाव वगळले; आई मनेका गांधी यांची जागा कायम!

अभिनेत्री कंगना रणौत, अरुण गोविल भाजपच्या पाचव्या यादीत!

अरविंद केजरीवाल यांना जनपाठिंबा दाखवण्यासाठी वापरले जगन्नाथ पुरीमधील जुन्या रथयात्रेचे छायाचित्र

 

दरम्यान, आमदार जी जनार्दन रेड्डी यांनी २५ मार्च रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे काल (२४ मार्च) सांगितले होते.पत्रकार परिषदेत त्यांनी समर्थकांचा सल्ला घेत हा निर्णय घेतल्याचे सांगितले होते.यावेळी ते बेल्लारी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार बी श्रीरामुलू यांना पाठिंबा देणार त्यांनी सांगितले.

जनार्दन रेड्डी हे बीएस येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमध्ये मंत्री होते आणि खाण घोटाळ्यात तुरुंगात होते. नंतर त्यांनी भाजपपासून वेगळे होऊन केआरपीपीची स्थापना केली होती.दरम्यान, २८ लोकसभेच्या जागा असलेल्या कर्नाटकात २६ एप्रिल आणि ७ मे रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

Exit mobile version