23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषकेकमधून कॅन्सर?? बेंगळुरुत केकच्या १२ नमुन्यात सापडले घटक!

केकमधून कॅन्सर?? बेंगळुरुत केकच्या १२ नमुन्यात सापडले घटक!

कर्नाटकचा बेकरींना इशारा, सुरक्षिततेच्या मानकांचे पालन करण्याचे दिले निर्देश

Google News Follow

Related

एखादा आनंदाचा क्षण येतो तेव्हा तो साजरा करण्यासाठी आपण केकचा वापर करतो. पण हाच केक आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरत असल्याचे समोर आले आहे. बेंगळुरूमध्ये १२ प्रकारच्या केकमध्ये कर्करोग निर्माण करणारे घटक आढळले आहेत, त्यामुळे राज्यासह देशात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता कर्नाटक अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाने लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत, बेकरींना इशारा आणि सुरक्षिततेच्या मानकांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

एका निवेदनात, कर्नाटक अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाने म्हटले आहे की, बेंगळुरूमधील बेकरीमधून गोळा केलेल्या १२ केकच्या नमुन्यांमध्ये अनेक कार्सिनोजेनिक पदार्थ आढळले आहेत. तपशिलानुसार, राज्य सरकारने तपासलेल्या २३५ केक नमुन्यांपैकी २२३ सुरक्षित आढळले आहेत  तर १२ केकमध्ये कृत्रिम रंगाची धोकादायक पातळी आढळून आली. यामध्ये रेड वेल्वेट आणि ब्लॅक फॉरेस्टसारखे नमुने आहेत.

हे ही वाचा : 

मनी लाँड्रिंग प्रकरणी माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनला ईडीचे समन्स!

नसरल्ला समर्थकांनो… कॅण्डल मार्च काढून काय होणारे त्यापेक्षा बांधवांसोबत जाऊन लढा

बदलापूर प्रकरण: महिनाभरानंतर शाळेच्या अध्यक्ष, सचिवांना ठोकल्या बेड्या

स्त्री शक्तीचा जागर: स्वराज्यप्रेरणा जिजाऊसाहेब!

हे केक बनवण्यासाठी त्यांना आकर्षित करण्यासाठी अनेक कृत्रिम रंगाचा वापर केला जातो, त्यामुळे आरोग्यास महत्त्वपूर्ण धोका निर्माण होतो, असे कर्नाटकच्या अन्न सुरक्षा विभागाने म्हटले आहे. विभागाने पुढे म्हटले की, ॲलुरा रेड, सनसेट यलो एफसीएफ, पॉन्सो ४आर, टार्ट्राझिन आणि कार्मोइसिन यांसारखे कृत्रिम रंग केकच्या नमुन्यांमध्ये आढळून आले आहेत, ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो. दरम्यान, या प्रकरणी सरकारने आता सर्व बेकरींना सुरक्षिततेच्या मानकांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा