कर्नाटकाची राजधानी बेंगळूरूमध्ये एका मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारा प्रकरणी कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. या प्रकरणाबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘मोठ्या शहरांमध्ये अशा घटना घडत असतात.’ गृहमंत्र्यांच्या या विधानानंतर भाजपाकडून संताप व्यक्त करत सरकारवर टीका केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गृहमंत्री जी. परमेश्वर या प्रकरणावर म्हणाले, मी दररोज पोलीस आयुक्तांना सतर्क राहण्यास सांगत आहे. प्रत्येक भागात गस्त घालून निरक्षण करण्यास सांगतो. जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा त्या निश्चितच लोकांचे लक्ष वेधून घेतात. पोलीस २४x७ काम करत आहेत. काही घटना इकडे तिकडे होतात. अशा मोठ्या शहरात अशा घटना घडत असतात. आम्ही कायद्यानुसार कारवाई करू. माझे आज सकाळीच आयुक्तांशी बोलणे झाले आहे, असे गृहमंत्री जी. परमेश्वर म्हणाले.
गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यावर भाजपाने संताप व्यक्त केला. भाजपा प्रवक्ते प्रशांत म्हणाले, हे अतिशय असंवेदनशील विधान आहे. ते जबाबदारीला टाळत आहेत आणि स्वतःला जबाबदार धरत नाहीयेत.
हे ही वाचा :
अमित शहा उतरले रणांगणात, निवडणुकांसाठी तयारी!
भारतीय शेअर बाजार का झाला क्रॅश?
“मला तुरुंगवासही होऊ शकतो” ममता बॅनर्जी असं का म्हणाल्या?
भूकंपापूर्वीच इशारा देईल ‘भूदेव’ अॅप
काय प्रकरण आहे?
बेंगळुरूमधील सद्दुगुंटेपल्याजवळ रस्त्यावर एका महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सारा फातिमा, डीसीपी साउथ ईस्ट बेंगळुरू यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. बीएनएसच्या कलम ७४, ७५, ७८ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.