28.4 C
Mumbai
Saturday, April 12, 2025
घरविशेषमुलीला रस्त्यात छेडले, कर्नाटकचे गृहमंत्री म्हणतात, अशा घटना घडत असतात!

मुलीला रस्त्यात छेडले, कर्नाटकचे गृहमंत्री म्हणतात, अशा घटना घडत असतात!

भाजपाकडून सडकून टीका

Google News Follow

Related

कर्नाटकाची राजधानी बेंगळूरूमध्ये एका मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारा प्रकरणी कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. या प्रकरणाबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘मोठ्या शहरांमध्ये अशा घटना घडत असतात.’ गृहमंत्र्यांच्या या विधानानंतर भाजपाकडून संताप व्यक्त करत सरकारवर टीका केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गृहमंत्री जी. परमेश्वर या प्रकरणावर म्हणाले, मी दररोज पोलीस आयुक्तांना सतर्क राहण्यास सांगत आहे. प्रत्येक भागात गस्त घालून निरक्षण करण्यास सांगतो. जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा त्या निश्चितच लोकांचे लक्ष वेधून घेतात. पोलीस २४x७ काम करत आहेत. काही घटना इकडे तिकडे होतात. अशा मोठ्या शहरात अशा घटना घडत असतात. आम्ही कायद्यानुसार कारवाई करू. माझे आज सकाळीच आयुक्तांशी बोलणे झाले आहे, असे गृहमंत्री जी. परमेश्वर म्हणाले.

गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यावर भाजपाने संताप व्यक्त केला. भाजपा प्रवक्ते प्रशांत म्हणाले, हे अतिशय असंवेदनशील विधान आहे. ते जबाबदारीला टाळत आहेत आणि स्वतःला जबाबदार धरत नाहीयेत.

हे ही वाचा : 

अमित शहा उतरले रणांगणात, निवडणुकांसाठी तयारी!

भारतीय शेअर बाजार का झाला क्रॅश?

“मला तुरुंगवासही होऊ शकतो” ममता बॅनर्जी असं का म्हणाल्या?

भूकंपापूर्वीच इशारा देईल ‘भूदेव’ अ‍ॅप

काय प्रकरण आहे?
बेंगळुरूमधील सद्दुगुंटेपल्याजवळ रस्त्यावर एका महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सारा फातिमा, डीसीपी साउथ ईस्ट बेंगळुरू यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. बीएनएसच्या कलम ७४, ७५, ७८ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. घटनेनंतर आरोपी लगेचच घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे.
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
241,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा