काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नुकतेच प्रकाशित झालेले राजकीय आत्मचरित्र ‘फाईव्ह डेकेड्स इन पॉलिटिक्स’मध्ये त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी मनात उच्च कोटीचा आदर असल्याचे म्हटले आहे. शिवाय त्यांच्यावर स्तुतिसुमनेही उधळली आहेत. पण, काँग्रेसकडून सावरकरांचा द्वेष करण्याचे काम सुरूचं आहे. एकीकडे आदर व्यक्त करत असताना सावरकरांबद्दल काँग्रेसला असलेला द्वेष पुन्हा उफाळून आल्याचे समोर आले आहे. कर्नाटकचे आरोग्य मंत्र्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान केले असून यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
धीरेंद्र झा यांच्या ‘गांधीज असासिनेशन: द मेकिंग ऑफ नथुराम गोडसे अँड हिज आयडिया ऑफ इंडिया’च्या कन्नड आवृत्तीच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतीत वादग्रस्त विधान केले आहे. वीर सावरकर हे ब्राह्मण होते, परंतु गोमांस खायचे, त्यांनी कधीही गोहत्येचा विरोध केला नाही असं आरोग्य मंत्री दिनेश गुंडुराव यांनी म्हटलं आहे.
मंत्री दिनेश गुंडूराव म्हणाले की, सावरकरांबद्दल लोक असेही बोलतात ते ब्राह्मण होते, मात्र उघडपणे मांस खायचे आणि त्याचा प्रचारही करत होते. महात्मा गांधी हे हिंदू संस्कृती परंपरेवर विश्वास ठेवणारे होते, ते कट्टर शाकाहारी होते ते सर्व दृष्टीने लोकशाहीवादी व्यक्ती होते. मोहम्मद अली जिन्नाच्या तुलनेत सावरकर अधिक कट्टरतावादी होते. सावरकरांची विचारधारा वेगळी होती त्यांनी कधी गोहत्येचा विरोध केला नाही असं त्यांनी म्हटलं. तसेच सावरकरांची विचारधारा भारतीय संस्कृतीपेक्षा वेगळी होती. आरएसएस, हिंदू महासभा आणि अन्य कट्टरपंथी समाजात द्वेष पसरवण्याचं काम करत आहेत. लोकांना हे समजून घेण्यासाठी सामाजिक आणि राजकीयदृष्टीने जागरूक राहण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.
हे ही वाचा :
मनी लाँड्रिंग प्रकरणी माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनला ईडीचे समन्स!
बदलापूर प्रकरण: महिनाभरानंतर शाळेच्या अध्यक्ष, सचिवांना ठोकल्या बेड्या
स्त्री शक्तीचा जागर: स्वराज्यप्रेरणा जिजाऊसाहेब!
संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांना इस्रायलमध्ये बंदी
पुढे ते असेही म्हणाले की, जिन्ना कट्टर मुस्लीम असूनही डुकराचे मांस खात होते. ते कट्टरपंथी नव्हते त्यांना सरकारमध्ये उच्च पद हवं होते, त्यासाठी वेगळ्या देशाची मागणी जिन्नांनी केली असंही दिनेश गुंडुराव यांनी सांगितले. गांधी एक धार्मिक व्यक्ती होते. सावरकरांच्या तुलनेत गांधी लोकशाहीवादी होते असंही दिनेश गुंडू राव यांनी विधान केले.