बहुचर्चित अशा ‘मिस इंडिया’ स्पर्धेचा निकाल समोर आला आहे. कर्नाटकच्या सिनी शेट्टी या तरुणीने यंदा ‘मिस इंडिया २०२२’चा किताब आपल्या नावे करत बाजी मारली आहे. ३ जुलै रोजी या स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईत पार पडली. अंतिम फेरीत राजस्थानची रुबल शेखावत फर्स्ट रनर अप तर उत्तर प्रदेशची शिनाता चौहान दुसरी रनर अप ठरली.
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ३ जुलै रोजी ‘मिस इंडिया २०२२’ ची अंतिम फेरी पार पडली. या अंतिम फेरीत सिनी या तरुणीने ३१ फायनलिस्टवर मात करत ‘मिस इंडिया २०२२’चा मुकूट आपल्या नावे केला.
View this post on Instagram
या स्पर्धेत सहा परिक्षकांच्या पॅनेलने स्पर्धकांचे सर्व पैलू लक्षात घेऊन विजेतीची निवड केली. यावेळी परिक्षकांच्या पॅनेलमध्ये नेहा धुपिया, मलायका अरोरा, रोहित गांधी, दिनो मोरिया, राहुल खन्ना आणि शामक डाबर यांचा समावेश होता. याशिवाय अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
हे ही वाचा:
डेन्मार्कमधील मॉलमध्ये गोळीबार; तिघांचा मृत्यू
उद्धव ठाकरेंना धक्का; गटनेते एकनाथ शिंदे, प्रतोद म्हणून भरत गोगावलेंना मान्यता
माजी पोलिस आयुक्त संजय पांडेंना ईडीचे समन्स
‘मिस इंडिया २०२२’चा किताब पटकावणारी सिनी शेट्टी ही २१ वर्षांची असून सध्या ती चार्टर्ड फायनान्स अॅनालिस्टचे (Chartered Financial Analyst) शिक्षण घेत आहे. सध्या सिनी कर्नाटकात राहत असली तरी तिचा जन्म मुंबईत झाला होता. सिनीने वयाच्या चौथ्या वर्षापासून भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली होती. सिनीने अनेक स्टेज शोसुद्धा केले आहेत.