बेंगळुरूमधील खाद्यप्रेमींसाठी एक धक्कादायक बातमी आहे. विशेषतः जे ग्राहक हॉटेलमध्ये इडलीचा आस्वाद घेण्यासाठी जातात त्यांना आता खूप काळजी घ्यावी लागणार आहे. कारण बेंगळुरूमधील अनेक हॉटेल्समध्ये बनवल्या जाणाऱ्या इडल्या असुरक्षित असल्याचे अन्न विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे.
अन्न विभागाने बेंगळुरूच्या विविध भागातून इडलीचे नमुने गोळा करून ते चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, ५२ हून अधिक इडली नमुने असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. याचे मूळ कारण म्हणजे, बेंगळुरूमध्ये अनेक ठिकाणी इडली बनवण्यासाठी कापडाऐवजी प्लास्टिकचे कव्हर वापरले जात आहेत. प्लास्टिकचा वापर केवळ इडली बनवण्यासाठीच नाही तर अन्न पॅकेजिंगसाठी देखील वापर केला जात आहे.
इडली बनवण्यासाठी त्याच्यावर झाकण्यात आलेले प्लास्टिक उष्णतेच्या संपर्कात आल्यानंतर कर्करोग निर्माण करणारे घटक उत्सर्जित करतात आणि ते मनुष्याच्या आरोग्यास धोकादायक आहे, असा तज्ञांनी इशारा दिला होता. तज्ञांच्या इशाऱ्यानंतर, अन्न विभागाने बेंगळुरूमधील अनेक ठिकाणांहून इडलीचे २५१ नमुने गोळा केले आणि ते चाचणीसाठी पाठवले. या २५१ नमुन्यांपैकी ५२ हून अधिक इडली नमुने असुरक्षित असल्याचे समोर आले. तथापि, काही नमुने अद्याप प्रलंबित आहेत.
हे ही वाचा :
महाशिवरात्रीच्या मिरवणुकीत बजरंग दलाकडून ‘लव्ह जिहाद’ थीमवर चित्ररथ
मुंबईत कसा सुरू आहे ‘हाऊसिंग जिहाद’?
उबाठाच्या संजय राऊतांविरोधात शिवसेना महिला आघाडीने उगारले ‘जोडे’
महाकुंभमध्ये आलेल्या ६६ कोटी भाविकांची गणना कशी केली?
या घटनेनंतर आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी इडली बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घातली आहे. आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव म्हणाले, प्लास्टिकमध्ये कार्सिनोजेन्स असतात आणि ते इडलीमध्ये जाऊ शकते, त्यामुळे याचा वापर करू नये. याबाबत आरोग्य विभाग लवकरच अधिकृत आदेश जारी करेल आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव म्हणाले.