कर्नाटक सरकारने एक मोठे पाऊल उचलत राज्यात हुक्का उत्पादनांच्या खरेदी आणि विक्रीवर बंदी घातली आहे. तरुणांचे आरोग्य लक्षात घेऊन हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. हुक्का बंदीची घोषणा कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी केली.आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी ट्विटरवर पोस्ट करत दिली माहिती.सार्वजनिक आरोग्य आणि तरुणांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने कर्नाटक सरकारने हुक्का बंदीचा निर्णय घेतला आहे, असे मंत्री दिनेश राव यांनी ट्विटरच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
ते पोस्टमध्ये म्हणाले की, धुम्रपानामुळे होणारे गंभीर आरोग्य धोके लक्षात घेऊन आम्ही राज्यभर हुक्क्यावर बंदी घालून निर्णायक पाऊल उचलले आहे. आम्ही सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायद्यात (COTPA) सुधारणा करून कर्नाटकात हुक्का धूम्रपानावर बंदी लागू करत आहोत. त्यांनी पुढे लिहिले, आमचे सरकार आमच्या भावी पिढ्यांसाठी एक सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी काम करत आहे.पोस्टमध्ये त्यांनी कन्नडमध्ये लिहिलेला राज्य सरकारचा अधिकृत आदेशही जोडला आहे.
हे ही वाचा:
समान नागरी कायदा विधेयक उत्तराखंड विधानसभेत मंजूर
‘श्रीकृष्णाने पाच गावे मागितली होती, आम्ही तीन मागतो’
अमेरिकेचा बगदादमध्ये ड्रोनहल्ला इराणसमर्थक दहशतवादी कमांडरसह तिघांचा मृत्यू
मिलिंद देवरांनंतर बाबा सिद्दीकी यांचा काँग्रेसला रामाराम
ಸಾರ್ವಜನಿಕರ ಆರೋಗ್ಯ ಮತ್ತು ಯುವ ಜನತೆಯ ಭವಿಷ್ಯದ ರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ರಾಜ್ಯದಾದ್ಯಂತ ಹುಕ್ಕಾ ನಿಷೇಧ
ಹುಕ್ಕಾ ಸೇವನೆಯಿಂದ ಜನರ ಆರೋಗ್ಯದ ಮೇಲೆ ಉಂಟಾಗುತ್ತಿರುವ ಗಂಭೀರ ಪರಿಣಾಮಗಳನ್ನು ಗಮನದಲ್ಲಿರಿಸಿ ರಾಜ್ಯದಾದ್ಯಂತ ಹುಕ್ಕಾ ಸೇವನೆಯನ್ನು ನಿಷೇಧಿಸಿ ಮಹತ್ವದ ಆದೇಶ ಹೊರಡಿಸಲಾಗಿದೆ.
ಸಿಗರೇಟ್ ಮತ್ತು ಇತರ ತಂಬಾಕು ಉತ್ಪನ್ನಗಳ ಕಾಯ್ದೆಗೆ (COTPA)… pic.twitter.com/Cm9umbfK5z
— Dinesh Gundu Rao/ದಿನೇಶ್ ಗುಂಡೂರಾವ್ (@dineshgrao) February 8, 2024
दरम्यान, आरोग्य मंत्री दिनेश राव यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये हुक्का बारवर बंदी घालण्याची आणि तंबाखू सेवनासाठी कायदेशीर वय १८ वरून २१ वर्षे करण्याची घोषणा केली होती. हुक्क्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या अज्ञात घटकांमुळे व्यसन लागण्याची शक्यता असते, असे मंत्री दिनेश राव यांनी सांगितले होते. मात्र, कर्नाटकच्या बार आणि रेस्टॉरंट असोसिएशनने त्यांच्या या निर्णयाला विरोध दर्शवला होता.आता या बार संघटना हुक्काबंदी विरोधात न्यायालयात जातील का हे पहावे लागेल.