कर्नाटकात परिक्षागृहात हिजाब घालण्यास मनाई!

मंगळसूत्र मात्र घालता येणार

कर्नाटकात परिक्षागृहात हिजाब घालण्यास मनाई!

कर्नाटक राज्यात विविध पदांच्या भरतीसाठी १८आणि १९ नोव्हेंबर रोजी पुनर्परीक्षा पार पडणार आहेत.या परीक्षेदरम्यान ब्लूटूथचा वापर करून कॉपीसारखा गैरप्रकार होऊ नये म्हणून कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने (KEA) ड्रेस कोड बंदी नियमावली जारी केली आहे.विद्यार्थ्यांनी आता परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचे हेडगियर, टोपी किंवा डोक्यावर कोणत्याही प्रकारचे कापड घालू नये असे कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे.नियम तोडल्यास विद्यार्थांना प्रवेश मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.मात्र, विवाहित हिंदू महिलांना मंगळसूत्र आणि पायातील जोडवी परिधान करण्यास मुभा देण्यात आली आहे.

जरी परीक्षा प्राधिकरणाकडून ड्रेस कोडमध्ये बंदी घातलेल्या वस्तूंच्या यादीमध्ये हिजाबचा स्पष्ट उल्लेख नसला तरी, त्यांना भरती परीक्षेदरम्यान हेडगियरचा नियम लागू होणार आहे.केईएने ऑक्टोबरमध्ये झालेल्या भरती परीक्षेदरम्यान हिजाब घालण्याची परवानगी दिली होती.

हे ही वाचा:

रस्ता अडवणाऱ्या दोघांनी हॉर्न वाजवणाऱ्या कॉलेज विद्यार्थ्याला केली जबर मारहाण

‘मोदी म्हणजे रॉकेट, अन् उद्धव ठाकरे फुसकाबार!

अमेरिकेमध्ये पॅलिस्टिनी समर्थक विद्यार्थ्याकडून वर्गामध्ये अडथळा!

कर्नाटकमध्ये तीन मुलांसह मातेची भोसकून हत्या

केईएने याबाबत म्हटले आहे की, परीक्षा हॉलमध्ये “डोके, तोंड किंवा कान झाकणारे कोणतेही कपडे किंवा टोपी” परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही. ब्लूटूथ उपकरणांचा वापर करून कॉपी सारख्या घटना घडू नयेत यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याचे केईएच्या आदेशात म्हटले आहे.

दरम्यान , मागील काही दिवसांपूर्वी कर्नाटक राज्य सेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनींना त्यांच्या सर्व दागिन्यांसह मंगळसूत्रही काढून ठेवण्यास सांगण्यात आले होते.त्यानंतर कर्नाटकमध्ये खळबळ उडाली होती.त्यांनतर उजव्या विचारसरणीच्या संघटनांच्या निषेधानंतर विवाहित हिंदू महिलांना मंगळसूत्र आणि पायातील जोडवी घालण्यास परवानगी देण्यात आली आहे.

 

 

 

 

 

 

 

Exit mobile version