राकेश प्रभूची उत्तम गोलंदाजी आणि शॉन रॉड्रिग्जची फलंदाजी याच्या जोरावर कर्नाटक स्पोर्टिंगने ७ विकेट्सनी विजय मिळवला आणि एमआयजी क्रिकेट क्लबला पराभूत केले. या विजयासह कर्नाटक स्पोर्टिंग क्लबने पद्माकर तालिम शिल्ड क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.
बांद्रा एमआयजी क्लब येथे झालेल्या या सामन्यात कर्नाटकने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. राकेश प्रभूने प्रतिस्पर्धी एमआयजीला रोखण्याचे काम चोख बजावले. राकेशने २४ धावा देत ४ बळी घेतले. त्यामुळे एमआयजीचा डाव १७ षटकांत १२६ धावांत आटोपला. त्यांच्या कौशल वळसंगकरने ३१ तर वरुण लवंडेने २८ धावा केल्या. या दोघांचा अपवाद वगळता एमआयजीच्या इतर फलंदाजांना अपयश आले.
हे ही वाचा:
मंदिर वही बनायेंगेचा नारा सत्यात उतरतांना बघतोय
नव्या लूकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बंदीपूर व्याघ्र प्रकल्पभेटीला
सोन्याच्या आयात ३०टक्क्यांनी घसरली पण चांदीची ६६ टक्क्यांनी वाढली
लखनऊमध्ये दाखल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौरा सुरू
एमआयजीने ठेवलेले हे लक्ष्य गाठताना कर्नाटकने घाईगडबड केली नाही. पण १२७ धावांचे लक्ष्य गाठताना त्यांना ३ फलंदाज गमवावे लागले. १७.५ षटकांत त्यांनी निर्धारित लक्ष्य गाठले. कर्नाटकतर्फे रॉड्रिग्जने ३९ चेंडूंत ५६ धावांची तडाखेबंद खेळी केली. तर त्याला गौरिश जाधवची उत्तम साथ लाभली. त्याने ३९ धावांची खेळी केली. कर्नाटकच्या अंकित चव्हाणने १९ धावांत २ बळी घेतले.
धावफलक : एमआयजी क्रिकेट क्लब १२६ (कौशल वळसंगकर ३१, वरुण लवंडे २८, राकेश प्रभू २४ धावांत ४ बळी) पराभूत वि. कर्नाटक स्पोर्टिंग ३ बाद १२७ (शॉन रॉड्रिग्ज ना. ५६, गौरिश जाधव ना. ३९, अंकित चव्हाण १९-२). कर्नाटक स्पोर्टिंगचे पदाधिकारी आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते कबड्डीपटू जया शेट्टी यावेळी उपस्थित होते.