26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषकारगिल विजय दिवस; दिवस अभिमानाचा आणि गौरवाचा!

कारगिल विजय दिवस; दिवस अभिमानाचा आणि गौरवाचा!

दरवर्षी २६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो

Google News Follow

Related

देशभरात दरवर्षी २६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. १९९९ साली याच दिवशी भारताने पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात मोठा विजय मिळवला होता. कारगिल युद्धात भारतीय सैन्यानी पाकिस्तानी सैन्याचा अक्षरशः धुव्वा उडवला. हा दिवस प्रत्येक देशवासियाकरिता गौरवाचा आणि अभिमानाचा दिवस आहे.

२६ जुलै १९९९ रोजी झालेल्या पाकिस्तान- भारत युद्धात भारताचा विजय घोषित करण्यात आला. याच विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जुलै हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या युद्धात स्वतःच्या प्राणाची बाजी लावून आपल्या देशाचे व देशवासियांचे शत्रूंपासून संरक्षण करणाऱ्या शूरवीर सैनिकांना कोटी-कोटी नमन.

कारगिल युद्ध ही भारताच्या इतिहातील एक महत्वाची घटना आहे. आजही कारगिल युद्धात मिळवलेलं अपयश पाकिस्तान विसरू शकलेला नाही.

१९७१ च्या भारत- पाकिस्तान युद्धानंतर दोन्ही देशांच्या सैन्यात अनेकदा संघर्ष होत होता. त्यात अणु चाचण्यांमुळे दोन्ही देशातील तणाव आणखी वाढला होता. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी दोन्ही देशांनी फेब्रुवारी १९९९ मध्ये लाहोर येथे घोषणापत्रावर स्वाक्षरी केली. या घोषणापत्रात काश्मिरच्या मुद्द्यावर दोन्ही देश चर्चेच्या माध्यमातून शांततेनं मार्ग काढतील असा करार करण्यात आला होता. मात्र, पाकिस्तानने पुन्हा कुरघोडी करायला सुरुवात केली.

हेही वाचा :

‘ओपेनहायमर’मधील भगवद्गीता वादानंतर ‘श्रीकृष्ण’ दिग्दर्शकाच्या पाठिशी

ब्रदीनाथ महामार्ग वाहून गेल्याने १००० यात्री अडकले

१२ वर्षांपूर्वीचे प्रकरण: गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणी गोपाळ कांडा निर्दोष

१२ वर्षांपूर्वीचे प्रकरण: गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणी गोपाळ कांडा निर्दोष

दरम्यान, पाकिस्तानच्या सैन्याने आणि अर्ध-सैनिक दलातील जवानांनी भारतात घुसखोरी करायला सुरुवात केली. ‘ऑपरेशन बद्र’च्या नावाखाली त्यांची घुसखोरी सुरू होती. त्यांचा मुख्य उद्देश होता की, काश्मीर आणि लडाखमध्ये वर्चस्व मिळवून भारतीय सैन्याला सियाचिन ग्लेशियरपासून दूर ठेवणं. सुरुवातीला ही एक घुसखोरी आहे आणि काही दिवसांत त्यांना बाहेर काढलं जाईल असा समज भारताचा झाला होता. मात्र, नियंत्रण रेषेवरील स्थिती आणि घुरखोरांच्या नियोजित रणनितीचा मागोवा घेतल्यानंतर ही छोटी घुसखोरी नसून काहीतरी मोठा कट असल्याचा अंदाज भारताला आला. त्यानंतर भारत सरकार आणि लष्कराने ‘ऑपरेशन विजय’ची आखणी केली. सैनिकांना सीमारेषेवर पाठवलं. हे युद्ध तब्बल ६० दिवस चाललं आणि २६ जुलै १९९९ रोजी भारताने या युद्धात विजय मिळवला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा