धक्कादायक!! गुगलवर कान्होजी आंग्रेंची पायरेट म्हणून ओळख

हिंदवी स्वराज्यातील मराठा आरमाराचे प्रमुख अशी ओळख असलेले कान्होजी आंग्रे यांची गुगलवर वेगळीच ओळख दाखवत असल्याचे लक्षात आले आहे.

धक्कादायक!! गुगलवर कान्होजी आंग्रेंची पायरेट म्हणून ओळख

हिंदवी स्वराज्यातील मराठा आरमाराचे प्रमुख अशी ओळख असलेले कान्होजी आंग्रे यांची गुगलवर वेगळीच ओळख दाखवत असल्याचे लक्षात आले आहे. कान्होजी आंग्रे यांच्या नावाचा उल्लेख हा गुगलवर पायरेट म्हणजे लुटारु किंवा समुद्री चाचा असा दिसून येत आहे. डॉ. प्रशांत भाम्रे यांनी ट्विट करुन ही बाब उघडकीस आणली आहे. यानंतर सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

गुगलवर कान्होजी आंग्रे असं टाकल्यास तिथे पायरेट असे लिहून येत आहे. कान्होजी आंग्रे यांची ही ओळख चुकीची असून या संदर्भातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

भाम्रे यांनी ट्विट करत नागरिकांना आवाहन केले आहे की, “गुगल वर ‘कान्होजी आंग्रे’ सर्च करा, नावा पुढे दिसणारे तीन डॉट वर क्लीक करून ‘send feedback’ क्लिक करा, नवीन window open झाल्यावर तिथे ‘incorrect’ वर क्लिक करून ‘फीडबॅक’ मध्ये ‘Maratha Navy Admiral’ असे लिहून सेंड करा. तसेच इतरांनाही तसेच करायला सांगा,” असे भाम्रे यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

नाशिक अपघातप्रकरणी ट्रकचालकाला अटक

बालविवाहाचे प्रमाण झारखंडमध्ये अधिक

शरद पवार म्हणतात, बॉलिवूडला टॉप पोझिशनला पोहोचवण्यात मुस्लिमांचं मोठं योगदान

उद्धव ठाकरेंना दिलेल्या ४ हजार ६८२ प्रतिज्ञापत्रावर बनावट रबर स्टॅम्पचा वापर

कान्होजी आंग्रे हे मराठा आरमाराचे प्रमुख होते. त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढून मराठा आरमाराची स्थापना केली. कान्होजींच्या काळात त्यांनी विदेशी सत्तांना सागरी किनाऱ्यावर मोठे आव्हान निर्माण केले होते. ब्रिटिश आणि पोर्तुगीज आरमाराचे त्यात प्रचंड नुकसान झाले होते. भारतातील त्यांच्या वाढत्या वर्चस्वावर अंकुश लावला होता.

Exit mobile version