कन्हैया कुमार यांना हार घालण्याच्या बहाण्याने मारहाण

कन्हैया कुमार यांना हार घालण्याच्या बहाण्याने मारहाण

काँग्रेसचे ईशान्य दिल्लीतील लोकसभा उमेदवार कन्हैया कुमार यांच्यावर शुक्रवारी त्यांच्या मतदारसंघात निवडणूक प्रचारादरम्यान हल्ला झाला. पुष्पहार घालण्याच्या बहाण्याने त्यांच्याजवळ आलेल्या काही लोकांनी त्याला बेदम मारहाण केली.

आम आदमी पक्षाच्या (आप) महिला नगरसेवक छाया गौरव शर्मा यांच्याशीही या बदमाशांनी गैरवर्तन केले. कर्तार नगर येथील आप कार्यालयाजवळ घडलेल्या या घटनेबाबत त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. शर्मा यांनी तक्रारीत आरोप केला आहे की, त्यांची शाल हिसकावून घेण्यात आली आणि त्यांच्या पतीला बाजूला नेऊन धमकावले. जमावावर काळी शाई फेकण्यात आली. या झटापटीत तीन-चार महिलांसह काही जण जखमी झाले, असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्हैयाकुमार हे कर्तार नगरमधील आप कार्यालयातून नगरसेवक छाया शर्मा यांची भेट घेतल्यानंतर बाहेर पडले, तेव्हा हा हल्ला झाला.

‘बैठकीनंतर छाया शर्मा या कन्हैया कुमारला पाहण्यासाठी खाली आल्या तेव्हा काही लोकांनी येऊन कन्हैया कुमार यांना पुष्पहार घातला. त्यांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर काही लोकांनी कन्हैया कुमार यांच्यावर शाई फेकली आणि त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा छाया शर्मा यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी गैरवर्तन केले आणि त्यांना धमकावले,’ अशी माहिती ईशान्य दिल्लीच्या पोलिस उपायुक्तांनी दिली.

या घटनेनंतर, हल्लेखोरांचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे, ज्यामध्ये दोन व्यक्तींनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘कन्हैया कुमार देशाचे तुकडे करण्याबाबत बोलतो, भारतीय लष्कराच्या विरोधात बोलतो आणि आज आम्ही त्याला धडा शिकवला,’ असे हे पुरुष बोलताना दिसत आहेत.

हे ही वाचा:

मुंबईकरांनो रेकॉर्डब्रेक मतदान करा…देशात सगळे जुने विक्रम तुटणार आहेत

“तेव्हापासून उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडून दिलंय”

काँग्रेसचा आता आमच्या ‘राहुलला सांभाळा’चा प्रयोग, सोनियांनी पदर पसरला

मविआबद्दल राज ठाकरे म्हणाले, जे सत्तेत येणारच नाहीत त्यांच्याबद्दल का बोलावे?

‘परंतु देशाचे तुकडे करण्याची भाषा करणाऱ्यांना आम्ही दिल्लीत येऊ देणार नाही,’ असे व्हिडिओवरील एका व्यक्तीने ठामपणे सांगितले. कन्हैया कुमार भाजपचे मनोज तिवारी यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. ‘हा हल्ला मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार मनोज तिवारी यांनी केला होता,’ असा आरोप कन्हैया कुमार यांनी केला आहे. माझ्या वाढत्या लोकप्रियतेमुळे विद्यमान खासदार तिवारी हताश आहेत आणि म्हणूनच त्यांनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी गुंड पाठवले. २५ मे रोजी मतदानाने जनता हिंसाचाराचे उत्तर देईल,’ असेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version