28 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरविशेषएअरफोर्सच्या गणवेशातील कंगना वाह भाई वाह

एअरफोर्सच्या गणवेशातील कंगना वाह भाई वाह

Google News Follow

Related

प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रानौत लवकरच आपल्यासमोर एका नव्या अवतारात येणार आहे. यावेळी तेजस यांना या चित्रपटातून भारताने बनवलेल्या पहिल्यावहिल्या संपूर्ण स्वदेशी असलेल्या तेजस विमानाची कथा कंगना आपल्यासमोर घेऊन येणार आहे.

२००६ मध्ये कंगना राणावतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. परंतु २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या तनु वेड्स मनु या चित्रपटाने कंगनाला बॉलिवुडमध्ये नावारूपाला आणलं. २०१४  मध्ये प्रदर्शित झालेला क्वीन हा सिनेमा सुद्धा लोकप्रिय झाला होता. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही आणि अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये काम केलं. ज्यामध्ये तनु वेड्स मनु रिटर्न यासारखे प्रेक्षकांनी अमाप प्रेम केलेले सिनेमे सुद्धा आहेत. परंतु कंगनाने अनेक बायोपिक सुद्धा बनवले. यामध्ये २०१९ साली कंगनाचा आलेला मनिकर्णिका हा झाशीच्या राणीवर आधारित सिनेमा सुद्धा गाजला होता. २०२० साली तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावरील चित्रपटातसुद्धा कंगनाने काम केलं होतं. आता तेजस या आपल्या नव्या चित्रपटाबरोबर कंगना प्रेक्षकांसमोर पुन्हा एकदा येणार आहे. तेजस मध्ये कंगना आपल्याला भारतीय हवाई दलातील एका फायटर पायलटच्या अवतारात दिसणार आहे. या सिनेमातील कंगना जे पात्र साकारणार आहे त्याचे नाव तेजस गिल असे असणार आहे.

हे ही वाचा:

अफगाणिस्तानातील भारतीय सुखरूप! कोणाचेही अपहरण नाही

सीताराम कुंटे यांनीच टॅपिंगला मंजुरी दिली होती, मग…

मनसुख हिरेन नंतर कळवा खाडीत सापडला आणखीन एका उद्योजकाचा मृतदेह

अनिल देशमुखांना वॉरंट बजावणार का?

कंगनाने सिनेमाच्या बाहेरही कायमच आपली मतं निर्भीडपणे मंडळी आहेत. त्यामुळे अनेकवेळा कंगनाला टीकेचा सामनाही करावा लागला आहे. परंतु अशा सर्व टीका परतवत आणि त्यांना जशास तसे उत्तर देत कंगना कायमच मतं मांडत आली आहे. नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकांनंतर कंगनाने जेंव्हा तिथली परिस्थिती मंडळी तेव्हा थेट ट्विटरने कंगनाचे अकाउंट बॅन केले होते. परंतु तरीही कंगना शांत बसली नाही. तिने कू या स्वदेश ऍप्पवर अकाऊंट उघडलं आणि स्वतःची मतं मांडताच राहिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा