कंगनाला कोविडची लागण

कंगनाला कोविडची लागण

विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रनौतला कोविडची लागण झाली असल्याचे तिने तिच्या इन्स्टाग्रामवरून सांगितले आहे. कंगना तिच्या घरी हिमाचलला जाण्याची तयारी करत होती. प्रवासापूर्वी कोविडची चाचणी केल्यानंतर तिला कोविड झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

हे ही वाचा:

जाणत्या-अजाणत्यांचे बार बार देखो

कोविड पाठोपाठ बळावतोय आणखी एका आजाराचा धोका

दिल्लीत १०५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स काळ्याबाजारातून जप्त

कोविड रुग्णांना भारतीय बनावटीच्या ‘वायुपुत्रा’ची साथ

कंगनाने इन्स्टाग्रामवर शनिवारी सकाळी पोस्ट करून ही माहिती दिली. तिने पोस्टमध्ये लिहिले की, ‘दोन-तीन दिवसांपासून मला खूप दमल्यासारखे आणि अशक्तपणा जाणवत होता. तसेच माझे डोळेही जळजळत होते. हिमाचलमधील माझ्या घरी जायचे होते त्यामुळे कालच मी करोनाची चाचणी केली. आज या चाचणीचा रिपोर्ट आला असून त्यात करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. करोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर मी स्वतःला घरातच क्वारन्टाइन करून घेतले आहेत. मला अजिबात कल्पना नाही की करोनाची लागण मला कशी झाली. आता मी त्याला नष्टच करणार आहे. लोकांना मी एकच आवाहन करते की कोणत्याही वाईट शक्तीला तुमच्यावर वरचढ होऊ देऊ नका. जर झालाच तर तुम्ही त्याला घाबरू नका कारण तो अधिक तुम्हाला घाबरवेल चला आपण सर्व मिळून कोविड- १९ चा नायनाट करू या. हा एक लहानसा फ्ल्यू आहे परंतु तो आता आपल्या सर्वांवर मानसिकरित्या दबाव टाकत आहे. त्याला घाबरू नका. हर हर महादेव’ असे सांगत करोनाशी लढा देण्यासाठी ती धैर्याने सामोरी जाणार असल्याचे तिने सांगितले आहे.

कंगनाने ही पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी तसेच सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. तर काही युझर्सने तिच्यावर टीकाही केली आहे.

दरम्यान, हिंदी सिनेमासृष्टीतील अनेक कलाकारांना करोनाची लागण झाली होती. त्यातून अनेकजण बरेही झाले आहेत. तर काहींना आपला प्राण गमवावा लागला.

Exit mobile version