सुप्रिया श्रीनेटच्या आक्षेपार्ह पोस्टवर कंगना राणौतचा पलटवार!

सोशल मीडियावर दिले चोख उत्तर

सुप्रिया श्रीनेटच्या आक्षेपार्ह पोस्टवर कंगना राणौतचा पलटवार!

नुकतेच भाजपने हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून कंगना राणौतला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार बनवले आहे.कंगना राणौतच्या यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर चित्रपट कलाकारांसह राजकारण्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान, काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेट यांनी अभिनेत्रीबाबत एक पोस्ट टाकल्याने वाद निर्माण झाला आहे.

वास्तविक, सुप्रिया यांनी कंगनाच्या फोटोसह आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती.यानंतर भाजप नेते काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत आहेत.अखेर ही पोस्ट त्यांच्याकडून हटवण्यात आली.मात्र, या प्रकरणावरून वाद थांबताना दिसत नाहीये.दरम्यान, आता या पोस्टवर कंगना राणौतने प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा:

ओम बिर्ला यांना टक्कर देण्यासाठी प्रल्हाद गुंजाळ मैदानात!

बंगळूरूमध्ये पाण्याचा अपव्यय करणाऱ्या २२ नागरिकांना लाखोंचा दंड

काँग्रेसच्या सहाव्या यादीतून पाच उमेदवार जाहीर

केजरीवालनी खलिस्तानी चळवळीला मदत करण्याचे आश्वासन दिले होते!

सुप्रिया यांनी पोस्ट केलेल्या फोटोचा स्क्रिन शॉट कडून कंगना राणौत यांनी लिहिले की, ”प्रिय सुप्रिया जी, मी एका कलाकाराच्या रूपात माझ्या करिअरमध्ये मागील २० वर्षांच्या काळात प्रत्येक प्रकारच्या महिलेच्या भूमिका साकारल्या आहेत.क्वीन चित्रपटात एक साधी भोळी मुलगी पासून धाकड चित्रपटात गुप्तहेर पर्यंत, मणिकर्णिकामध्ये एक देवीच्या रूपात तर चंद्रमुखीमध्ये राक्षसी भूमिकेमध्ये, रज्जोमधील वेश्येपासून ते थलायवीमधील क्रांतिकारक नेत्यापर्यंत.

आपण आपल्या मुलींना जुन्या चालीरीती पासून मुक्त केलं पाहिजे.याव्यतिरिक्त, आपण लैंगिक कार्यकर्त्यांच्या आव्हानात्मक जीवनाचे किंवा परिस्थितीचे वर्णन करण्यासाठी अशा अपशब्द वापरणे टाळले पाहिजे. प्रत्येक स्त्री तिच्या सन्मानाला पात्र आहे….”, असे कंगना राणौत यांनी पोस्ट करत सुप्रिया श्रीनेट यांना उत्तर दिले आहे.

दरम्यान, काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेट यांनी कंगना राणौत यांची एका फोटोसह एक पोस्ट शेअर केली होती.यामध्ये सुप्रिया श्रीनेट यांनी लिहिले की, काय भाव आहे मंडीमध्ये कोणी सांगेल?, अशी आक्षेपार्ह आणि वादग्रस्त पोस्ट सुप्रिया श्रीनेट यांनी शेअर केली होती.श्रीनेट यांच्या पोस्टनंतर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.वाढता वाद पाहता अखेर सुप्रिया यांनी ती पोस्ट डिलीट केली.

Exit mobile version