कंगना रानौतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

कंगना रानौतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

मनोरंजन क्षेत्रात मानाचे असणाऱ्या ६७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यात कंगना रानौतला देखील पुरस्कार मिळाला आहे, तर सुशांत सिंह रजपुत याच्या छिछोरे चित्रपटाला देखील पुरस्कार प्राप्त झाला आहे.

कंगना रानौतला मणिकर्णिका चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट स्त्री अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून छिछोरे चित्रपटाला पुरस्कार मिळाला आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; संसदेत खासदारांची मागणी

रश्मी शुक्लांनीही उघड केला भ्रष्टाचार- परमबीर सिंह

पाकिस्तानी बायको लपवणाऱ्या उमेदवाराला डाव्यांचे समर्थन

मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार बार्डो या चित्रपटाने पटकावला आहे. त्या बरोबरच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पदार्पणाचा पुरस्कार प्रितम मोरे यांच्या खिसा या चित्रपटाला प्राप्त झाला आहे. या बरोबरच मराठी रसिकांच्या स्मरणात गाण्यांसाठी लक्षात राहिलेल्या आणि कथानकासाठी लोकप्रिय ठरलेल्या आनंदी गोपाळ या चित्रपटाला देखील सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिजाईनसाठी पुरस्कार मिळाला आहे. बार्डो याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून सावनी रविंद्र हीला पुरस्कार मिळाला आहे. लता भगवान करे आणि पिकासो या चित्रपटांचा विशेष उल्लेख देखील केला गेला.

हे सर्व पुरस्कार २०१९ पासूनच्या चित्रपटांसाठी घोषित करण्यात आले. गेल्यावर्षी हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणे अपेक्षित होते, परंतु कोविड-१९ मुळे तो अघोषित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आला होता. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या फिल्म फेस्टिवल विभागाच्या तर्फे हे पुरस्कार जाहिर करण्यात आले.

Exit mobile version